mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

संतापजनक! ड्युटीवर असताना मंगळवेढ्यातील एस.टी कर्मचाऱ्याचा उपचार न मिळाल्याने मृत्यू

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
November 1, 2020
in राज्य, मंगळवेढा

मुबईत बेस्टच्या मदतीला आलेल्या सोलापूर विभागातील मंगळवेढा आगराचे वाहक भगवान गावडे (वय 48) यांचा वेळेवर उपचार न मिळाल्याने कुर्ला येथील एका हॉटेलमध्ये मृत्यू झाला.

मूळव्याधीचा त्रास असलेल्या गावडे यांची गेल्या तीन दिवसांपासून प्रकृती खालावली होती. एसटीचे वाहतूक नियंत्रक एन. के. जाधव आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे उपचार मिळावा म्हणून तक्रार केली. मात्र वेळेवर दखल न घेतल्याने परिणामी उपचाराविनाच जीव गमवावा लागला आहे. मात्र, अद्याप गावडे यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झालेले नाही.

मुंबईतील रस्त्यावरील प्रवाशांची कोंडी फोडण्यासाठी बेस्ट उपक्रमामध्ये एसटीचे 1000 गाड्या सेवेत आल्या आहेत.त्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांची राहण्याची आणि जेवणाची सोय व्हावी, यासाठी ओयो हॉटेल कंपनीला कंत्राट दिले आहे.

मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये कर्मचाऱ्यांकडून जेवणाचा दर्जा नसल्याच्या तक्रारी वारंवार केल्या जात होत्या. तरी सुद्धा एसटीने त्याची दखल घेतली नाही.

सोलापूर विभागातील 48 कर्मचारी मुंबईत बेस्ट उपक्रमात प्रवासी सेवा देण्यासाठी 26 ऑक्टोबर रोजी दाखल झाले होते. त्यामध्ये मंगळवेढा डेपोच्या भगवान गावडे यांना समावेश होता.

गावडे यांना पूर्वीपासून मुळव्याधीचा त्रास असतानाही मंगळवेढा आगार व्यवस्थापकाने त्यांना जबरदस्तीने मुंबईत कर्तव्यावर पाठवले होते. दरम्यान प्रतीक्षा नगर ते बोरिवली कर्तव्यावर कामगिरी बजावत असताना गेल्या तीन दिवसांपासून गावडे यांचा आजार वाढत गेला.

संबंधित एसटीच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या आजाराची कोणतीही दखल घेतली नसल्याने अखेर गावडेना आपला जीव गमवावा लागला आहे.

गावडे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पार्थिवाला कुर्ला येथील भाभा हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले आहे. तर या घटनेची कुर्ला पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून अधिक तपास सुरू केला आहे.

कर्मचारी आजारी असले तरी सुद्धा एसटी महामंडळाच्या आगार व्यवस्थापकाकडून जबरदस्तीने मुंबई पाठवल्या जात आहे.

यामध्ये जर कर्मचाऱ्यांना कोणत्या आजाराच्या व्याधी असेल त्याची सुद्धा दखल घेतल्या जात नाही. उलट आगार व्यवस्थापक निलंबनाची कारवाई करण्याची धमकी दिली जात असल्याने नाईलाजास्तव मुंबई मध्ये यावे लागले.

मृतक कर्मचाऱ्याचे सहकारी

मृत कर्मचाऱ्यांनी आपण आजारी असल्याचे मंगळवेढा आगार व्यवस्थापकांना सांगितले होते. तरी सुद्धा त्यांनी जबरदस्तीने गावडे यांना मुंबई पाठवले, त्यांना आधीच मूळव्याधीचा आजार होता. त्यामध्ये मुंबईतील जेवणाची गैरसोय होत होती. त्यामुळे गावडे यांना त्रास होत होता. दरम्यान मध्यरात्री त्यांचा मृत्यू झाला.

मृतक कर्मचाऱ्याचे सहकारी

एसटी कर्मचा-यांचा मृत्यू केवळ प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे झालेला असून मुंबईमध्ये बेस्ट सेवेसाठी आलेल्या कर्मचा-यांची सुरक्षिततेची कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काळजी घेतली जात नाही, जेवणाची व्यवस्था निकृष्ठ दर्जाची असल्याने अनेक कर्मचा-यांना अपचनाचा त्रास होतोय याबाबत प्रशासनाशी वारंवार पाठपुरावा करून सुध्दा कारवाई होत नाही, त्यातच आता एक बळी गेला आहे, आणखी किती बळी घेणार? दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी अन्यथा कर्मचा-यांचा तीव्र असंतोष उफाळून येईल:-मुकेश तिगोटे, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक)

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: उपचार अभावी मृत्यूएस.टी.कर्मचारीमंगळवेढा

संबंधित बातम्या

शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

​जमीन खरेदी-विक्रीत मोठा बदल! महाराष्ट्रात लवकरच ‘लँड टायटलिंग कायदा’; जमिनीच्या वादांवर सरकारचा कायमचा तोडगा

September 19, 2026

​पावसाचा खंड पडल्याने सरकार अलर्ट! विहिरी खोदण्यावर बंधने, पाणी चोरी रोखण्यासाठी संयुक्त पथके सज्ज; शासनाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय

September 19, 2026
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

एसटीचा प्रवास अधिक सोपा! आता धावत्या बसमध्येच होणार NCMC कार्ड रिचार्ज; महिला अन् ज्येष्ठ नागरिकांची पायपीट थांबली

September 19, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

मोठी बातमी! राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी व बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर

September 18, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

मांडव उधळला! साखरपुडा झाला, मांडवही सजला… पण ऐनवेळी पोलिस पोहोचले; मंगळवेढ्यात बालविवाह रोखत पालकांना दणका; लिहून घेतले ‘हे’ हमीपत्र

September 17, 2026
मंगळवेढ्यातील दोन महिलांनी अनेकांना घातला लाखोंचा गंडा; मोठे रॅकेट उघडकीस येणार

मोठी बातमी! मंगळवेढ्यातील सराईत गुन्हेगार महादेव इरकरवर MPDA; पोलिसांकडून मुसक्या आवळत येरवड्यात रवानगी

September 18, 2026
सदगुरू बागडे बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आज श्रीक्षेत्र मारोळी येथील मठावर विविध कार्यक्रमाचे आयोजन; ह.भ.प संदेश भोसले महाराज यांची माहिती

मारोळीत उसळणार भक्तीसागर! बागडे बाबांच्या पुण्यतिथीचा सोहळा आज उत्साहात संपन्न होणार ​भक्तांच्या उपस्थितीत होणार पुष्पवृष्टी; मठाधिपती संदेश भोसले महाराजांचे उपस्थितीचे आवाहन

September 17, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

राजकीय भूकंप! आता थांबायचं नाय, अनिल सावंतांना विधानसभेत पाठवायचंच; विठ्ठल परिवारातून थेट बंडाचे निशाण, प्रस्थापितांना उघड आव्हान

September 16, 2026
अडीच हजार कोटींच्या ठेवी ही जनतेच्या कष्टाची पावती; ठेवीदारांचा विश्वास जपणे हीच धनश्रीची खरी गणेशभक्ती : प्रा.शोभाताई काळुंगे

अडीच हजार कोटींच्या ठेवी ही जनतेच्या कष्टाची पावती; ठेवीदारांचा विश्वास जपणे हीच धनश्रीची खरी गणेशभक्ती : प्रा.शोभाताई काळुंगे

September 15, 2026
Next Post
विद्यापीठाची पोलिसात धाव, अंतिम परीक्षेवर सायबर अटॅक

क्रेडिट कार्ड नंबर तसेच बँक यूजर आयडी विचारुन सोलापूरच्या तरुणाची ६४ हजारांची फसवणूक

ताज्या बातम्या

शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

​जमीन खरेदी-विक्रीत मोठा बदल! महाराष्ट्रात लवकरच ‘लँड टायटलिंग कायदा’; जमिनीच्या वादांवर सरकारचा कायमचा तोडगा

September 19, 2026

​पावसाचा खंड पडल्याने सरकार अलर्ट! विहिरी खोदण्यावर बंधने, पाणी चोरी रोखण्यासाठी संयुक्त पथके सज्ज; शासनाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय

September 19, 2026
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

एसटीचा प्रवास अधिक सोपा! आता धावत्या बसमध्येच होणार NCMC कार्ड रिचार्ज; महिला अन् ज्येष्ठ नागरिकांची पायपीट थांबली

September 19, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

मोठी बातमी! राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी व बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर

September 18, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

मांडव उधळला! साखरपुडा झाला, मांडवही सजला… पण ऐनवेळी पोलिस पोहोचले; मंगळवेढ्यात बालविवाह रोखत पालकांना दणका; लिहून घेतले ‘हे’ हमीपत्र

September 17, 2026
मंगळवेढ्यातील दोन महिलांनी अनेकांना घातला लाखोंचा गंडा; मोठे रॅकेट उघडकीस येणार

मोठी बातमी! मंगळवेढ्यातील सराईत गुन्हेगार महादेव इरकरवर MPDA; पोलिसांकडून मुसक्या आवळत येरवड्यात रवानगी

September 18, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..