mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मंगळवेढ्यात ऊसाच्या फडात; श्रीलंका, नेपाळमध्ये आढळणारे दुर्मीळ वाघाटी मांजराचे दर्शन

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 29, 2020
in मंगळवेढा, सोलापूर
मंगळवेढ्यात ऊसाच्या फडात; श्रीलंका, नेपाळमध्ये आढळणारे दुर्मीळ वाघाटी मांजराचे दर्शन

बेसुमार जंगलतोडीमुळे वन्य पशुप्राणी हल्ली लोकवस्तीजवळील माळरानं, शेतांमध्ये दिसू लागली आहेत. बिबट्याच्या वावरामुळे भीतीच्या सावटाखाली येऊन दोन महिने उलटून गेले असतानाच मंगळवेढ्याजवळील एका शेतात छोट्या चणीच्या दुर्मीळ वाघाटी मांजराचे दर्शन झाले.

– हेही वाचा

: शेतकऱ्यांच्या न्यायासाठी छावा संघटना धावली; मायक्रो फायनान्स,वीज बिलासाठी प्रांतकार्यालयावर काढला मोर्चा 

: सावधान! ऑनलाईन शॉपिंगमधून स्मार्टफोन्स मागवताय मग ‘ही’ बातमी वाचा नाहीतर तुमची होईल मोठी फसवणूक 

अर्थातच पिलांसह म्यॉव, म्यॉव करणारं हे जंगली मांजर भीतीदायक नव्हतं; पण वाघासारखं दिसणारं वेगळं अन् आकारानं मोठं होतं..वनविभागानं वाघाटी मांजराच्या पिलांवर लक्ष ठेवून त्यांची आई आल्यानंतर सुटकेचा नि:श्वास सोडला.

मंगळवेढा तालुक्यातील घरनिकी येथील बापू भुसे यांच्या उसाच्या फडात तोडणी करताना श्रीकृष्ण डुकरे या शेतमजुरास पहिल्यांदा सुई म्यॉव सुई म्यॉव आवाज करणारी ही पिल्लं दिसायला मात्र वाघाच्या बछड्यासारखी वाटत असल्याने त्यांनी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना कळविले.

उपवन संरक्षक धैर्यशील पाटील यांनी स्वत: जागेवर जाऊन पाहणी करून दुर्मीळ वाघाटी मांजर असल्याची खात्री केली. डॉक्टर सुहास सलगर त्या पिलांची वैद्यकीय तपासणी करून त्या पिलांना देण्यात येणाऱ्या अन्नाची माहिती दिली.

पिले लहान असल्याने आईची भेट घडवून आणणे अत्यंत गरजेचे होते. परिसरात इतर प्राण्यांचा वावर होऊ नये याची दक्षता घेत टेहळणीसाठी कॅमेरे लावून वनखात्याने चोहोबाजूने जागता पहारा ठेवला. या मोहिमेत वनपरिक्षेत्र अधिकारी विजय बाठे, विलास पवळे, वनरक्षक गोरख माळी, भगवान मासाळ, सुनीता पत्की, किसन कांबळे, रमेश माने, सोपान कळसाई, दऱ्याप्पा न्यामगुंडी, तमण्णा रूपनर, सागर राऊत या वनविभागाच्या अधिकारी आणि सेवकांचा सहभाग होता.

पहाटे साडेतीनच्या सुमारास दुर्मीळ वाघाटी मांजराने एकेक करीत दोन्ही पिलांना अलगदपणे आपल्या तोंडात धरून सुरक्षित ठिकाणी नेताना वनखात्याच्या कॅमेऱ्यात कैद झाले. हे दुर्मीळ मांजर दिसण्याची पहिलीच घटना असल्याची शक्यता आहे.(लोकमत)

भारत, श्रीलंका, नेपाळमध्ये आढळणारे मांजर.

वाघाटीमांजर हे मुख्यत: भारत, श्रीलंका आणि नेपाळच्या पश्चिम भागात आढळतात. शिकार आणि अधिवासास अनुकूल वातावरण न मिळाल्याने यांची दुर्मीळ होत चाललेल्या प्रजातीत गणना केली जाते. लहान पक्षी, सरपटणारे प्राणी, काहीवेळा पाळीव बदक आणि कोंबड्या हे त्यांचे खाद्य आहे.

मांजरे रात्रीच कार्यप्रवण असतात. ती रात्री पिलांच्या शोधात येईल, याची खात्री होती. पहाटे साडेतीनच्या सुमारास मांजरीने अलगदपणे पिलांना घेऊन जातानाचे चित्र कॅमेरात कैद झाले. सध्या ऊसतोडीचे दिवस आहेत. मुंगूस, कोल्हे, ससे, लांडगे आदींची पिलं आढळतात.– धैर्यशील पाटील, उपवनसंरक्षक, सोलापूर.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: मंगळवेढा घरनिकीमध्ये आढळलेवन विभागाची पाहणीवाघाटी मांजर

संबंधित बातम्या

३ वर्षांचं वय अन् काळजाचा थरकाप उडवणारा विक्रम! पोलीस पुत्राने १४ पायऱ्यांची उभी भिंत चढून जाज्वल्य डोरलेचा ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये इतिहास रचला

३ वर्षांचं वय अन् काळजाचा थरकाप उडवणारा विक्रम! पोलीस पुत्राने १४ पायऱ्यांची उभी भिंत चढून जाज्वल्य डोरलेचा ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये इतिहास रचला

June 21, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

शेतकऱ्यांच्या संयमाचा विजय! सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यात शेतीसाठी मिळणार आता आठ तास वीज; ‘टाळे ठोकू’ इशाऱ्याची प्रशासनाने घेतली धडक दखल

June 21, 2026
मंगळवेढेकरांनो! दलित मित्र कदम गुरुजी महाविद्यालय व इंग्लिश स्कूलचे स्नेहसंमेलन; ‘ही’ प्रसिद्ध सिनेअभिनेत्रीची असणार उपस्थिती

दहावीच्या निकालात मोठा उलटफेर! पुनर्मूल्यांकनानंतर मंगळवेढ्याची पाटील महाराष्ट्रात सर्वप्रथम; मंगळवेढा इंग्लिश स्कूलच्या शिरपेचात रोवला मानाचा तुरा

June 20, 2026
धक्कादायक! ज्या रुग्णालयात हजारो रुग्णांवर उपचार केले तिथंच घेतला अखेरचा श्वास; सोलापूरमधील प्रसिद्ध न्युरोफिजिशियन डॉ.शिरीष वळसंगकर यांनी जीवन संपवलं

सोलापुरात खळबळ! देवमाणूस गेला, पण मागे वादाची ठिणगी पडली; डॉ. वळसंगकर यांच्या कुटुंबातील ‘तो’ वाद अखेर चव्हाट्यावर; पोलिसांसमोर मोठा खुलासा

June 20, 2026
मोठी बातमी! धैर्यशील मोहिते पाटलांनी दिला भाजपा पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा; भाजपाची मोठी डोकेदुखी वाढणार

अदृश्य शक्तीनं आम्हाला साथ दिली, दुष्काळात ‘वसंत’ बहरेल; धैर्यशील मोहिते पाटलांनी व्यक्त केला विजयाचा विश्वास

June 19, 2026
‘चांगले दिवस येणार होते, पण तू सोडून गेलीस…’ रीलस्टार रोहिणी पारध्ये आत्महत्येप्रकरण; पतीची पहिली पोस्ट चर्चेत, नेमके कारण काय?

स्क्रीनवर लाखो फॉलोअर्स, पण खऱ्या आयुष्यात नरकयातना! रिल स्टार रोहिणी पाराध्येच्या मृत्यूचा खरा विलन अखेर समोर; मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

June 20, 2026
मंगळवेढा ब्रेकिंग! पोलीस पाटलाचा अपघाती मृत्यू

ब्रेकिंग! सुसाट कंटेनरने दुचाकी उडवली मंगळवेवेढ्यातील शिवसेनेचा आक्रमक आणि निष्ठावंत चेहरा काळाच्या पडद्याआड

June 18, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

सोलापुरात ‘सिंघम’ इफेक्ट! आता जनतेचाच थेट वॉच; दररोज येताहेत भेसळीच्या ढीगभर तक्रारी; सोलापूर FDA कडून दंडात्मक कारवाईचा बडगा सुरू

June 18, 2026
रक्ताच्या नात्याप्रमाणे सूर्योदय परिवार सदैव तुमच्या पाठीशी उभा राहील; अनिलभाऊंची भावनिक साद; सेवानिवृत्त व पदोन्नत कर्मचाऱ्यांचा ‘शाही सन्मान’

रक्ताच्या नात्याप्रमाणे सूर्योदय परिवार सदैव तुमच्या पाठीशी उभा राहील; अनिलभाऊंची भावनिक साद; सेवानिवृत्त व पदोन्नत कर्मचाऱ्यांचा ‘शाही सन्मान’

June 17, 2026
Next Post
सोलापुरात शेतकऱ्याच्या पत्नीने घरातून साडेचार लाखांच्या दागिनेसह रोख रक्कम घेऊन केले पलायन

सोशल मीडियावरून दुचाकी गाडी खरेदीचा मोह सोलापुरातील युवकांना आला अंगलट; चार जणांना लुटले

ताज्या बातम्या

३ वर्षांचं वय अन् काळजाचा थरकाप उडवणारा विक्रम! पोलीस पुत्राने १४ पायऱ्यांची उभी भिंत चढून जाज्वल्य डोरलेचा ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये इतिहास रचला

३ वर्षांचं वय अन् काळजाचा थरकाप उडवणारा विक्रम! पोलीस पुत्राने १४ पायऱ्यांची उभी भिंत चढून जाज्वल्य डोरलेचा ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये इतिहास रचला

June 21, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

शेतकऱ्यांच्या संयमाचा विजय! सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यात शेतीसाठी मिळणार आता आठ तास वीज; ‘टाळे ठोकू’ इशाऱ्याची प्रशासनाने घेतली धडक दखल

June 21, 2026
मंगळवेढेकरांनो! दलित मित्र कदम गुरुजी महाविद्यालय व इंग्लिश स्कूलचे स्नेहसंमेलन; ‘ही’ प्रसिद्ध सिनेअभिनेत्रीची असणार उपस्थिती

दहावीच्या निकालात मोठा उलटफेर! पुनर्मूल्यांकनानंतर मंगळवेढ्याची पाटील महाराष्ट्रात सर्वप्रथम; मंगळवेढा इंग्लिश स्कूलच्या शिरपेचात रोवला मानाचा तुरा

June 20, 2026
धक्कादायक! ज्या रुग्णालयात हजारो रुग्णांवर उपचार केले तिथंच घेतला अखेरचा श्वास; सोलापूरमधील प्रसिद्ध न्युरोफिजिशियन डॉ.शिरीष वळसंगकर यांनी जीवन संपवलं

सोलापुरात खळबळ! देवमाणूस गेला, पण मागे वादाची ठिणगी पडली; डॉ. वळसंगकर यांच्या कुटुंबातील ‘तो’ वाद अखेर चव्हाट्यावर; पोलिसांसमोर मोठा खुलासा

June 20, 2026
बळीराजाला मोठा दिलासा! शेतकरी कर्जमाफीची घोषणा; देवेंद्र फडणवीसांची घोषणा; कोणाचे कर्ज होणार माफ?

मोठी बातमी! सरकारी जमिनी हडपणाऱ्यांना मोठा दणका… ‘या’ जमिनींवर आता थेट महाराष्ट्र शासनाचे नाव लागणार…;  ‘इतक्या’ महिन्यांचा अल्टीमेटम

June 20, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

शेतकऱ्यांनो! राज्याला पावसाची हुलकावणी, हवमान विभागाचा हादरवणारा अंदाज; आता थेट ‘या’ तारखेनंतरच पाऊस

June 21, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..