mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

महिला हॉस्पिटलमध्ये सर्व सुविधा उपलब्ध; विविध विभाग सुरु, तज्ञ डॉक्टरांची टीम कार्यरत

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 25, 2020
in आरोग्य
महिला हॉस्पिटलमध्ये सर्व सुविधा उपलब्ध; विविध विभाग सुरु, तज्ञ डॉक्टरांची टीम कार्यरत

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी म्हणून उपेक्षित राहिलेल्या परंतु संताच्या पावन नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या मंगळवेढा तालुक्यात तसे पाहिले तर आरोग्य सेवा पुरवणाऱ्या जेमतेम संस्था कार्यरत आहेत.आता मंगळवेढा तालुक्यातील मानांकित व महिलांच्या आरोग्याबाबतच्या दर्जेदार सेवा पुरविण्यामुळे  नावारूपाला आलेल्या महिला हॉस्पिटल,बोराळे नाका, विजयपूर रोड वरील नवीन भव्य इमारतीत काही मंगळवेढा तालुका व शहरी भागातील डॉक्टर एकत्र येऊन मंगळवेढा हेल्थ एलएलपी संचलित एक नवीन विविध विभागाचे हॉस्पिटल सुरू केले आहे.

महिला हॉस्पिटल चे रूपांतर आता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये होत आहे यामध्ये अस्थीरोग, मेडिसिन,
बालरोग, यूरोलॉजी, डेंटल वगैरे अनेक विभाग सुरू होणार असून अद्यावत असे आयसीयू(ICU) अतिदक्षता विभाग सुरू झालेला आहे महिला हॉस्पिटल अँड मल्टीस्पेशालिटी मंगळवेढा येथे सध्या मेडिसीन व यूरोलॉजी विभाग सुरू झाले असून डॉक्टर अविनाश सुरवसे हे एमडी मेडिसिन असून त्यांचे वैद्यकीय शिक्षण सायन हॉस्पिटल मुंबई येथे झाले आहेत.

तर डॉक्टर शशिकांत आसबे एम एस जनरल सर्जरी व एमसीएच यूरोलॉजी असून वैद्यकीय शिक्षण पटियाला झाले असून मूत्ररोग संबधी सेवा देत आहेत. विविध विभागातील आरोग्य सेवा देत असताना लागणाऱ्या पॅथॉलॉजी लॅब, सोनोग्राफी, 2D-इकोकार्डिओग्राफी सेवा सुरू झालेले असून एक्स-रे सिटीस्कॅन डायलिसिसच्या सेवाही त्वरित सुरू होत आहेत.

महिला हॉस्पिटलच्या नवीन इमारतीमध्ये सर्व प्रकारच्या सेवा उपलब्ध असून शास्त्रोक्त पद्धतीने बांधकाम आहे. उत्कृष्ट बांधकामासाठी महाराष्ट्रातील आर्किटेक इंजिनिअर आणि अल्ट्राटेक कंपनी मार्फत घेतलेल्या स्पर्धेत या इमारतीस नामांकनसुद्धा  प्राप्त झाले आहे या इमारतीचे वैशिष्ट्य म्हणजे स्वयंचलित अग्निशामक यंत्रणा, रुग्णाना ने-आण साठी रॅम्प,व लिफ्टची सोय आहे.काँफेरन्स हॉल, सीवेज वॉटर ट्रीटमेंट प्लांट, रेन वॉटर हार्वेस्टिंग, लाईटनिंग प्रोटेक्टर, 24 तास आर ओ वॉटर सप्लाय, 24 तास अखंड वीज पुरवठ्यासाठी 125 कवीचा जनरेटरचे अशा सोयींनी युक्त आहे. मोड्युलर ऑपरेशन थिअटर सह अन्य दोन अद्यावत असे शस्त्रक्रिया ग्रह कार्यान्वित आहेत.

तसेच वातानुकूलित स्पेशल रूम, सुपर डीलक्स रूम सुद्धा उपलब्ध आहेत. मंगळवेढ्या सारख्या ग्रामीण भागात प्रोस्टेट किडनीचे विकार, हर्निया, अपेंडिक्स ,आतड्यांचे आजार, मुतखडा ,मूत्राशयाचे आजार विविध प्रकारच्या हाडांचे आजार व फॅक्चर हृदय विकार, उच्च रक्तदाब मधुमेह, अस्थमा, विषबाधा, सर्पदंश, कावीळ आणि लिव्हरचे इतर आजार, बालरोग तज्ञाकडून बालकांचे अतिदक्षता विभागातील उपचार, डेंटल ( दाताचे आजार )वगैरे अनेक प्रकारच्या सेवा देण्यासाठी तसेच काही डॉक्टरांनी एकत्र येऊन अशाप्रकारचे सर्व जनतेला तातडीची आरोग्यसेवा, किफायतशीर शुल्कामध्ये, सोनोग्राफी,एक्स-रे, व सीटी स्कॅन आदी यंत्राच्या साहाय्याने  देण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सध्या हॉस्पिटलमध्ये तालुक्यातील ग्रामीण भागात प्रथमच महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत वरील अनेक सेवा अगदी मोफत (नियम व अटीस अधीन राहून) सेवा देण्यात येत आहेत. येत्या काळात अनेक तज्ञ डॉक्टरांना बोलवून हॉस्पिटलच्या सर्व विभागाच्या सेवा व सर्व स्त्री पुरुष ,लहान मुले व नवजात बालके यांच्या सुद्धा शस्त्रक्रिया मंगळवेढा ग्रामीण जनतेला उपलब्ध होणार असल्याने आता मंगळवेढाकराना मोठ्या शहरांकडे धाव घ्यावी लागणार नसल्याचे चित्र निर्माण होत आहे.

डॉ.पुष्पांजली शिंदे ह्या स्त्री रोग तज्ञ व प्रसुती तज्ञ असून 7 नोव्हेंबर 2005 पासून मंगळवेढा शहरात महिलांच्या आरोग्य सेवा पुरवण्यासाठी त्यांनी महिला हॉस्पिटल ची स्थापना की सुरू केली होती. ग्रामीणसह ,शहरातील अनेक महिलांना त्यांनी सेवा दिली आहे .प्रसूती बरोबर सोनोग्राफी केंद्रात व निवारण गर्भाशयाचे आजार व शस्त्रक्रिया सेवा त्यांनी दिलेल्या आहेत.

मंगळवेढा तालुक्यात अन्य भागातील अनेक रुग्ण मंगळवेढ्याला येऊ लागले आहेत सध्या महिला हॉस्पिटलची भव्य व अद्ययावत इमारत उभी राहिली असून महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या लाभार्थी मोठ्या प्रमाणात दिसून येत असल्याने हॉस्पिटलला मिनी सिव्हील हॉस्पिटलचे स्वरूप आलेले आहे.

महिला हॉस्पिटल मंगळवेढा या ठिकाणी शेकडो प्रसूती आणि सिझेरियन शस्त्रक्रिया अगदी नि:शुल्क होत असून मंगळवेढ्याचा तालुक्याच्या आजूबाजूच्या परिसरातील पंढरपूर, सांगोला, जत मोहोळ तालुक्यातील शेकडो मातांनी मोफत प्रसूती अथवा सिझरेयन च्या सेवा घेतल्या आहेत. यासाठी प्रसूतीच्या वेळेस येताना केवळ आधार कार्ड, रेशन कार्ड व लसीकरण कार्ड सादर करावे लागते या योजनेअंतर्गत दाखल झाले पासून सर्व तपासण्या, औषधे मोफत दिली जातात व शेवटी घरी जाण्याचे पैसेसुद्धा दिले जातात . ग्रामीण भागातील जनतेला कोरोना
(covid-19) महामारी च्या काळात मोठा आधार मिळत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

ग्रामीण भागातील जनतेला चांगल्या दर्जाची आरोग्यसेवा पुरविण्यासाठी स्वतःचे हॉस्पिटल सांभाळून अनेक डॉक्टरांनी एकत्र येऊन सर्व सुविधा या हॉस्पिटल मध्ये उपलब्ध करण्याचा हा मंगळवेढा तसा पहिला प्रयत्न असून विविध स्तरातून त्याचे कौतुक होत आहे.त्यामुळे तालुक्यातील ग्रामीण भागातील आरोग्य सेवेतील नंदादीपाचे स्थान निर्माण केले आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: डॉक्टरांची टीम कार्यरतमंगळवेढामहिला हॉस्पिटलसर्व सुविधा उपलब्ध

संबंधित बातम्या

धक्कादायक! ज्या रुग्णालयात हजारो रुग्णांवर उपचार केले तिथंच घेतला अखेरचा श्वास; सोलापूरमधील प्रसिद्ध न्युरोफिजिशियन डॉ.शिरीष वळसंगकर यांनी जीवन संपवलं

मोठी खळबळ! सोलापुरचे डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणात मनिषाचा हादरवणारा मेल पोलीसांच्या हाती; आतापर्यंत काय काय झालं? जाणून घ्या

June 18, 2025
नागरिकांनो! ‘नवजीवन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल & ICU’चा आज मंगळवेढ्यात उद्घाटन सोहळा

नागरिकांनो! ‘नवजीवन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल & ICU’चा आज मंगळवेढ्यात उद्घाटन सोहळा

June 8, 2025
मोठी बातमी! सोलापूरचे नवे SP अतुल कुलकर्णी; शिरीष सरदेशपांडे यांची ‘या’ ठिकाणी झाली बदली

अधिकारी असावा तर असा! सोलापूर जिल्ह्यातील सहा गाव पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी घेतली दत्तक; काय आहे संकल्पना, जाणून घ्या…

June 7, 2025
पंढरीतील महाआरोग्य शिबिरात ५००० वैद्यकीय कर्मचारी वारकऱ्यांच्या सेवेसाठी उपलब्ध असणार; आरोग्यमंत्री सावंत यांची संकल्पना

लय भारी सुविधा! थकवा जाण्यासाठी वारकऱ्यांना मिळणार पाय दाबण्याचे मशीन; पाऊस आल्यास वारकऱ्यांसाठी टेंट उभारण्यात येणार

June 4, 2025
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! सिझरनंतर अतिरक्तस्राव, दुसऱ्या रुग्णालयात नेलं, पण महिलेनं जीव गमावला; रुग्णालय चालक दवाखान्याला कुलूप लावून पसार

June 3, 2025
मंगळवेढा-पंढरपूर मतदारसंघातून रामचंद्र सलगर शेठ उमेदवारी अर्ज दाखल करणार; ओबीसी उमेदवारीमुळे काटे की टक्कर होणार

रामचंद्र सलगर (शेठ) यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या धर्मगावात मोफत आरोग्य तपासणी शिबीर; औषध वितरण सोहळा व विविध कार्यक्रमाचे आयोजन

May 31, 2025

बापरे! आषाढी एकादशीपूर्वी कोविड पोहचला सोलापूर जिल्ह्यात; ‘या’ तालुक्यात दोन पॉझिटिव्ह रुग्ण, प्रशासनाची चिंता वाढली

May 31, 2025
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! चालत्या गाडीवरच आला तरुणाला हृदयविकाराचा झटका; काही सेकंदात होत्याचं नव्हतं झालं

May 29, 2025
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

नागरिकांनो! महाराष्ट्राला धडकी भरवणारी बातमी; ‘या’ जिल्ह्यात 21 वर्षीय तरुणाचा कोरोनामुळे मृत्यू

May 25, 2025
Next Post

सिध्दनाथ ज्वेलर्सच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्ताने नवीन योजनेंचा ग्राहकांना लाभ होईल : नगराध्यक्षा अरुणा माळी

ताज्या बातम्या

कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

खळबळ! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटच्या वादातून शाळेतच केले कृत्य

June 26, 2025
माझ्या मरणास प्रशासन कारणीभूत! बठाण, उचेठाण अवैध वाळू उपसा प्रशासनाच्या नाकावर टिचून सुरू; ठेक्यावर कारवाई का होत नाही?; सामाजिक कार्यकर्तेने दिला आत्मदहनाचा इशारा

जप्त केलेल्या वाळू साठ्यामधून मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावातील घरकूल धारकांना मोफत प्रती पाच ब्रास वाळू वाटप

June 26, 2025
वाहतूक पोलिसाच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न; सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

धक्कादायक! शेव करताना गॅसचा स्फोट, २ चिमुकल्या बहिणींचा मृत्यू, आई वडिलांसह ४ गंभीर जखमी; मंगळवेढा तालुक्यातील घटना

June 26, 2025
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

वीज ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! इतिहासात प्रथमच आता लवकरच महागड्या वीजेपासून होणार सुटका; कोणाला होणार फायदा?

June 26, 2025
दामाजी महाविद्यालय, इंग्लिश स्कूलची यशाची परंपरा कायम, प्राची ओमने व निकिता आवताडे तालुक्यात प्रथम; मंगळवेढ्याचा निकाल १२ टक्क्याने घसरला, यंदा ८५.८४ टक्के उत्तीर्ण

लाखो विद्यार्थ्यांसाठी मोठी अपडेट! दहावीची परीक्षा 2026 पासून दोनवेळा घेणार; नव्या नियमांना मंजुरी

June 25, 2025
विधानपरिषद निवडणुकीचा निकाल जाहीर, कोणाकोणाचा विजय? महाविकास आघाडीला मोठा धक्का; निकाल जाणून घ्या एका क्लिकवर

मोठी बातमी! ‘या’ महामार्गास कॅबिनेटची मंजुरी, महाराष्ट्र GST कायद्यात सुधारणा; मंत्रिमंडळ बैठकीत ‘हे’ 8 मोठे निर्णय

June 24, 2025
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा