मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । कोरोना चाचणी निगेटिव्ह पण लक्षणे असलेल्या दोन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे ज्येष्ठ व्यक्तींनी कोरोना विषाणूच्या संसर्गाबाबत दक्ष राहणेच हितावह आहे , असे आरोग्य विभागाने म्हटले आहे.
सध्या ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. कोरोनाने मृत्यू होण्याचे प्रमाणही वाढले आहे. यामध्ये ज्येष्ठ व्यक्तींचा समावेश मोठ्या प्रमाणावर आहे. इतर आजार असणाऱ्यांना संसर्गाचा लवकर इफेक्ट होतो हे आत्तापर्यंतच्या अभ्यासावरून स्पष्ट झाले आहे.
पण जिल्ह्यात दोन मृत्यूने आरोग्य विभागाचे टेन्शन वाढविले आहे. या रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे होती , पण दोन ते तीनवेळा चाचणी घेऊनसुद्धा रिपोर्ट निगेटिव्ह आले असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.
मुंबईच्या निवृत्त आरोग्यसेवकाचा अशाच पद्धतीने संशयास्पद मृत्यू झाला आहे. मुंबईत कोरोना वाढला म्हणून ते गावी परतले. लॉकडाऊनचे नियम शिथिल झाल्यावर ते कर्नाटकातील इंडी येथे नातेवाईकाच्या कार्यक्रमाला गेले. तेथून आल्यावर आजारी पडले.
त्यामुळे सोलापुरातील एका खासगी रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणे आढळली. पण प्रयोगशाळेची चाचणी निगेटिव्ह आली. आजार बळावल्यावर पुन्हा चाचणी घेण्यात आली. दुसरी चाचणीही निगेटिव्ह आली. यामध्येच त्यांचा मृत्यू झाला.
आरोग्य विभागातील एका कर्मचाऱ्याला त्रास होऊ लागल्याने सोलापुरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या कर्मचाऱ्यामध्येही लक्षणे दिसत होती. पण चाचणी निगेटिव्ह आल्याने दुबार तपासणी केली. पण निगेटिव्ह असतानाच त्यांचा मृत्यू झाला.या दोन्ही मृत्यूमुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे.
दरम्यान यावर आरोग्य विभागाकडून या संदर्भात तज्ज्ञांमार्फत सल्लामसलत करुन नेमके कारण काय व्यूव्हरच आखली आहे.(लोकमत)
दुसऱ्यांदा चाचणी निगेटिव्ह
लक्षणे असतानाही दोघांचा मृत्यू झाला आहे. पहिली चाचणी निगेटिव्ह आल्यावर शंका आल्याने दुसऱ्यांदा तपासणी केली तरीही चाचणी निगेटिव्ह आली. चाचण्या घेतानाचा क्रम चुकल्यावरही असे घडू शकते काय,अशी शंका येत आहे. – डॉ.भीमाशंकर जमादार, जिल्हा आरोग्य अधिकारी.
Solapur health department increased Corona’s two tests were negative but two died with symptoms
???? राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9561617373 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज