मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
सांगोला येथून मित्राचे लग्नकार्य उरकून येत असताना मंगळवेढा-सांगोला रोड वरील घाडगे मळा येथे दुचाकीस्वारास अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकीवरील आकाश शिवराया पाटील (वय.२२ रा.सोड्डी ता.मंगळवेढा) हा तरुण जागीच ठार झाला असून शिद्धराया श्रीमंत बिराजदार (वय.३२ रा.सोड्डी) हे गंभीर जखमी झाल्या असल्याची घटना आज शनिवारी रात्री ८ च्या सुमारास घडली आहे.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क : 7588214814
याबाबत सविस्तर माहिती अशी की,सोड्डी ता.मंगळवेढा येथील मयत आकाश पाटील व जखमी शिद्धराया बिराजदार हे सांगोला येथे मित्राचे लग्नकार्य उरकून येत असताना मंगळवेढा ते सांगोला रोडवर असणाऱ्या घाडगे मळा येथे आले असता अज्ञात वाहनाने एम.एच.१३.सी.जी.२७५९ या बजाज पल्सर दुचाकीस जोराची धडक दिल्याने दुचाकीस्वार आकाश पाटील यास गंभीर दुखापत होऊन तो जागीच मयत झाला आहे.
तर बार्शी येथे जलसंधारण विभागात सहाय्यक अभियंता असणारे शिद्धराया बिराजदार हे गंभीर जखमी झाले आहेत त्यांना पुढील उपचारासाठी सोलापूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
घटनासमजताच पोलीस हवालदार अलमगीर लतीब,सचिन पारधी व विकास क्षीरसागर यांनी घटनास्थळी भेट दिली.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज