मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
ब्रम्हपुरी ता.मंगलवेढा येथील पत्रकार प्रमोद दिलीप बिनवडे यांना पत्रकारीता क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केल्याबद्दल व सामाजिक कार्यात विशेष योगदान दिल्याबद्दल अत्यंत मानाचा समजला जाणारा नवी दिल्ली येथील “भारतीय दलित साहित्य आकादमी”यांच्या वतीने दिला जाणारा “डाँ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय फेलोशिप सन्मान 2018” हा पुरस्कार साहित्य अकादमीचे राष्ट्रीय अध्यक्ष एस.पी.सुमनाक्षर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या पुरस्काराचे वितरण दि.९ डिसेंबर रोजी नवी दिल्ली येथील साहित्य अकादमीच्या सभागृहात मोठ्या उत्साहात झाले .काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष कै.बाबूजग जीवनराम हे भारतीय दलित साहित्य अकादमीचे संस्थापक असून एस.पी.सुमनाक्षर हे संध्याचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.या साहित्य अकादमीमध्ये मुख्य मार्गदर्शक म्हणून अरूणाचल प्रदेशचे राज्यपाल डाँ.मता प्रसाद,मिझोरामचे राज्यपाल डाँ.ए.पद्मनाबन,माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे,केंद्रिय मंत्री रामविलास पासवान,पंजाब विधान सभेचे सभापती चरणजीत सिंग अटवाल,महाराष्ट्राचे माजी न्यायमंत्री बबनराव घोलप,शिक्षणमहर्षी डाँ.विश्वनाथ कराड यांच्यासह विविध राष्ट्रीय मान्यवर या अकादमी मध्ये समाविष्ठ आहेत.
पत्रकार प्रमोद बिनवडे यांना मिळालेल्या या राष्ट्रीय पुरस्काराबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे .

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज