mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मंगळवेढा पत्रकार संघाने सामाजिक बांधिलकी जोपासली ः प्रभाकर घुले

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
मंगळवेढा पत्रकार संघाने सामाजिक बांधिलकी जोपासली ः प्रभाकर घुले

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

मंगळवेढा तालुका पत्रकार संघाने समाज उपयोगी उपक्रम राबवून खर्‍या अर्थाने सामाजिक बांधिलकी जोपासल्याचे प्रतिपादन जिल्हा गटसचिव संघटनेचे नेते प्रभाकर घुले यांनी केले.

मंगळवेढा तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष अ‍ॅड.दत्तात्रय तोडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवेढा तालुका पत्रकार संघ, जिल्हा दैनिक पत्रकार संघ, मंगळवेढा तालुका साप्ताहिक संपादक संघटना व मंगळवेढा श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने मंगळवारी सकाळी 11 वाजता श्री दामाजी मंदिर येथे प्रभाकर घुले व फटेवाडीचे सरपंच राजेंद्र फटे यांचे हस्ते गोरगरीब व गरजूंना मोफत ब्लँकेटचे वाटप करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी श्री दामाजी संस्थेचे अध्यक्ष विष्णुपंत आवताडे हे होते.

यावेळी घुले म्हणाले, समाजातील प्रत्येक घडामोडींवर पत्रकारांचे लक्ष असते तसेच त्यांचे उपेक्षित घटकांवरही लक्ष आहे. जिथे कोणतीही मदत पोहचू शकत नाही अशा लोकांना थंडीच्या दिवसात मायेचा आधार म्हणून ब्लँकेटचे वाटप केले. खरोखरच हा उपक्रम स्तुत्य आहे. पत्रकारांच्या या कार्याचा आदर्श इतरांनी घेतला पाहिजे.

यावेळी सत्कारमुर्ती अ‍ॅड.दत्तात्रय तोडकरी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमप्रसंगी एकमेकांना तिळगुळ वाटप करून मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.कार्यक्रमाचे प्रास्तविक पत्रकार तानाजी चौगुले यांनी केले. सुत्रसंचालन राजेंद्रकुमार जाधव तर आभार प्रदर्शन भारत दत्तु यांनी केले.

या कार्यक्रमास पत्रकार संघाचे संस्थापक दिगंबर भगरे, माजी अध्यक्ष शिवाजी पुजारी, बाबासाहेब सासणे, शिवाजी केंगार, अध्यक्ष ज्ञानेश्वर भगरे, जिल्हा दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष बाळासाहेब नागणे, कार्याध्यक्ष विलास मासाळ, साप्ताहिक संपादक संघटनेचे अध्यक्ष समाधान फुगारे यांचेसह विलास आवताडे, शंकर हजारे, आनंदराव जावळे, भिमराव मोरे, माधव कुलकर्णी, दत्तात्रय कोरे, अ‍ॅड.पवार, अ‍ॅड.विकास माळी, अ‍ॅड.जावेद मुल्ला, अशोक शिंदे, संभाजी सावंजी, पिंटू माने, संजय माळी, हरिप्रसाद देवकर, प्रथमेश तोडकरी, प्रांजली तोडकरी,  पत्रकार प्रल्हाद नाशिककर, मोहन वाले, संभाजी मस्के, दादासाहेब लवटे, लखन कोंडुभैरी आदि उपस्थित होते.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
मंगळवेढ्यात पारधी समाजाचे बेमुदत धरणे आंदोलन मोरे कुटुंबियांच्या वतीने  निष्ठांत भोजन

मंगळवेढ्यात पारधी समाजाचे बेमुदत धरणे आंदोलन मोरे कुटुंबियांच्या वतीने निष्ठांत भोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

सावधान! ‘लुटेरी दुल्हन’ सक्रिय; मंगळवेढ्यात नवरीने लावला २.७० लाखांचा चुना, पळून जाणाऱ्या ‘नवरी’सह महिला एजंट जेरबंद

April 26, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

मोठी बातमी! जो तक्रार करायला आला, तोच लुटारू निघाला; पोलिसांच्या जाळ्यात ‘तो’ तोतया चालक; मंगळवेढा पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

April 26, 2026
दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

मंगळवेढ्यात काळजाचा थरकाप! आईसह दोन मुलांचा साठवण तलावात बुडून अंत; एकाच कुटुंबातील तिघांचा अंत संपूर्ण गावात हळहळ

April 25, 2026
सोलापुरात शेतकऱ्याच्या पत्नीने घरातून साडेचार लाखांच्या दागिनेसह रोख रक्कम घेऊन केले पलायन

शेतकऱ्यांनो सावधान! ​मंगळवेढ्यात चोरट्यांची मजल आता पशुधनापर्यंत; सोन्या-चांदीसह डझनभर कोंबड्याही चोरीला; साडेतीन लाखांचा ऐवज लंपास

April 25, 2026
बाबो..! अशोक खरातच्या मोबाइलमधील डेटा पाहून पोलीसही चक्रावले, धक्कादायक माहिती समोर; पुन्हा गूढ वाढले

खळबळ! ‘हा’ निघाला खरातच्या पुढचा बाबा, 200 व्हिडीओ, 90 गोळ्या; पोलीसही हादरले

April 25, 2026
पदवीधरसाठी रणधुमाळी शिगेला; देशमुख, ढमाले, पाटील व लाड यांच्यात काटे की टक्कर

विधान परिषद निवडणुकीसाठी कुणाला तिकीट? भाजपने ‘या’ नावांची यादी दिल्लीला पाठवली; कुणाकुणाची नावे?

April 24, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा