mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

भीमानदीवरील जुना दगडी पुल पाण्याखाली; ‘या’ तालुक्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
भीमानदीवरील जुना दगडी पुल पाण्याखाली; ‘या’ तालुक्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

 


टीम मंगळवेढा टाईम्स । उजनी धरण परिसरात व व भीमा नदीच्या क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने भीमा नदीला पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे पंढरपूर नगर परिषदेच्या माध्यमातून शहरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असल्याची माहिती मुख्याधिकारी अनिकेत मानोरकार यांनी दिली.


पंढरपुरातील भीमा नदीपात्रामध्ये ६० हजार क्युसेक च्या आसपास पाणी आहे.


यामुळे नदीपात्र वरील जुना दगडी पुल पाण्यामध्ये बुडाला आहे. पूर परिस्थिती निर्माण झाली असून नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी केले आहे.

३५० वर्षापूर्वीचे वडाचे झाड जमीनदोस्त

भाळवणी (ता. पंढरपूर) येथील ऐतिहासिक निंबाळकर वाड्यासमोरील ३५० वर्षापूर्वीचे वडाचे झाड जमीनदोस्त झाले आहे, तर वाड्यातील विहीर ओसंडून वाहू लागली आहे.

मागील काही दिवसांपासून पंढरपुर तालुक्यात अतिवृष्टी होत आहे. काल पटवर्धन कुरोली, व भाळवणी ( ता.पंढरपूर ) मंडलात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे़ या अतिवृष्टीमुळे भाळवणी तेथील ऐतिहासिक निंबाळकर वाड्यासमोरील ३५० वर्षे जुने वडाचे झाड उन्मळून पडले आहे. 


वाड्यातील ऐतिहासिक विहीर अतिवृष्टीमुळे वाहू लागली आहे.निसगार्चे हे रौद्ररुप प्रथमच पाहयायला मिळत आसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

मागील २० वर्षातील सर्वात मोठा पाऊस यावर्षी पंढरपुर तालुक्यात पडला असून अनेक पिकात, घरात पाणी जाऊन पिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील काही ऐतिहासिक वस्तुंना ही फटका बसत आसल्याचे चित्र आहे. 

शुक्रवार झालेल्या अतिवृष्टीमुळे भाळवणी येथील ऐतिहासिक निंबाळकर वाड्यासमोरील३५० वर्षापूर्वीचे वडाचे झाड जमीनदोस्त झाले आहे. तर याच ऐतिहासिक वाड्यातील पाण्याची विहीर इतिहासात प्रथमच ओसंडुन वाहू लागली आहे. निसर्गचया प्रलयातून ऐतिहासिक वास्तू ही सुटत नसल्याचे चित्र आहे. ऐतिहासिक वाड्यातील या घटना पाहण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत.

पावसाने भंडीशेगाव येथील पुलाचे मोठे नुकसान


पंढरपूर तालुक्यात शुक्रवारी झालेल्या पावसाने भंडीशेगाव येथील पुलाचे मोठे नुकसान झाले आहे. पुलाचा एका बाजूचा अर्धा भाग खचला आहे आणि जागोजागी खड्डे पडले आहेत. वरचा बहुतांश भाग वाहून गेल्याने मागील १२ तासांपासून पुलावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे. 

गुरुवार आणि शुक्रवारी तालुक्यातील भाळवणी, भंडीशेगाव सर्कल मध्ये अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे कासाळ ओढ्याला पूर आला आहे. या ओढ्याला एवढ्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच पूर आल्याचे नागरिकांकडून सांगितले जाते.

२०११-२०१२ साली नव्याने बांधण्यात आलेल्या भंडीशेगाव येथील पुलावरून हिल्यांदाच पाणी वाहिले आहे. शुक्रवारी सायंकाळी ७ वाजल्यापासून या पुलावरील वाहतूक पुर्णपणे बंद करण्यात आली आहे. 

त्यामुळे पंढरपूर – अकलूज, माळशिरस या भागातील वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे. प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी शुक्रवारी रात्री उशिरा या ओढ्यावरील पाण्याची पाहणी करून वाहतूक बंद केली होती.

शनिवारी सकाळी पुराचे पाणी ओसरले असले तरी पुलाचे मोठे नुकसान झाले आसल्याचे प्रशासनाचया निदर्शनास आले आहे. शनिवारी सकाळी तहसीलदार वैशाली वाघमारे यांनी पुलाची पाहणी केली. 

पुलाचे मोठे नुकसान झाले असून आज दिवसभर वाहतूक बंद राहण्याची शक्यता आहे. पुलाची दुरुस्ती तातडीने करण्याची गरज आहे. अन्यथा धोकादायक अवस्थेतील पुलावरून वाहतूक सुरू केल्यास एखादी दुर्घटना होण्याची शक्यता व्यक्त आहे.

बिबट्या सदृश्य प्राण्याचा वावर

पटवर्धन कुरोली (ता. पंढरपुर) परिसरात गेल्या दोन दिवसांपासून बिबट्या सदृश्य प्राण्याचा वावर आहे. या प्राण्याने पट-कुरोली येथील शेतकरी विजय मोरे यांची शेळी व शेवते येथील शेतकरी चंद्रकांत तोंडले यांचे बोकड फस्त केले आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.(लोकमत)

The old stone bridge over the Bhimanadi in Pandharpur under water;  Alert to citizens

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Latest NewsSolapur

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
सोलापूर ग्रामीण दलात पुन्हा पोलिसाचा ‘कोरोना’मुळे बळी, पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू

सोलापूर ग्रामीण दलात पुन्हा पोलिसाचा 'कोरोना'मुळे बळी, पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

मोठी बातमी! सोलापूर ZP चा अध्यक्ष ‘या’ तारखेला ठरणार; तर 11 पंचायत समितीचे कारभारी 12 मार्चला निवडणार…

March 5, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! राज्यातील सर्व पाणंद रस्त्यांबाबत सरकारचा मोठा निर्णय

March 5, 2026
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

खुशखबर! लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट; अर्थसंकल्पात मुख्यमंत्री करणार मोठी घोषणा

March 5, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! मोबाइल वापरण्यास दिला नाही म्हणून १३ वर्षांच्या मुलाची आत्महत्या; सोलापूर जिल्हा हादरला

March 4, 2026
दुर्दैवी घटना! सांगोल्यातील ‘या’ गावात दोन बहिणींचा शेततळ्यात बुडून मृत्यू

नियतीचा क्रूर खेळ! पोलीस भरतीची तयारी अन् जिद्दीचा शेवट, भीमा नदीत बुडून अजय काळाच्या पडद्याआड; ब्रह्मपुरीवर शोककळा

March 4, 2026
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील एका गावाची निवड, १० लाख रुपयांचे बक्षीस; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ ग्रामपंचायतीचा होणार सन्मान

मोठी बातमी! मंगळवेढा पंचायत समिती सभापती व उपसभापती निवड १२ मार्चला; ‘या’ नावावर होणार शिक्कामोर्तब?

March 3, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा