mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मंगळवेढ्यातील शिवसैनिकांच्या नजरा निवडीकडे; नवा कारभारीचा शोध

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
मंगळवेढ्यातील शिवसैनिकांच्या नजरा निवडीकडे; नवा कारभारीचा शोध

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

महाविकास आघाडी’च्या माध्यमातून राज्यात शिवसेना सत्तेच्या ड्रायव्हिंग सीटवर आहे. मंत्रीपद मिळालेल्या तानाजी सावंत यांनी पक्ष शिस्तीचा शिरस्ता मोडल्याने जिल्ह्यातील त्यांच्या समर्थकांचे राजीनामे मंजूर करण्यात आले आहेत. आता मंगळवेढा तालुक्यातील निवडी होणार असल्याने तालुक्यातील शिवसैनिकांच्या नजरा या निवडीकडे लागून राहिल्या आहेत आणि त्या कधी होतात, याकडे पदाधिकार्‍यांचे लक्ष लागून आहे.

तानाजी सावंत यांनी जिल्ह्यातील शिवसेनेवरची पकड मजबूत केली होती. त्यावेळी मंगळवेढा तालुक्यातील शिवसेनेची निवड त्यांच्या मर्जीतील लोकांना विचारात घेऊन करण्यात आली असल्याची चर्चा तालुक्यातील शिवसैनिकांमधून होत असली तरी जिल्ह्यातील बहुतांश भागावर सावंत यांच्या विचारातील लोकांना शिवसेनेत काम करण्याची संधी देण्यात आली होती.

मंगळवेढा तालुक्यात 25 वर्षांपासून काही अपवाद वगळता प्रा. येताळा भगत यांनी शिवसेनेचे तालुकापद भूषवले होते. एक वेळेस त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम असो किंवा शिवसेनेचा दसरा मेळावा याशिवाय शिवसेनेचे आंदोलन, रास्ता रोको यामध्ये शिवसेना सक्रिय असायची. 2014 सली महायुतीचे सरकार आले. यानंतर मंगळवेढा तालुक्यातील शिवसैनिकांमध्ये वास्तविक पाहता सरकारच्या माध्यमातून जास्तीत जास्त पक्षसंघटन मजबूत करण्याची संधी मिळाली असतानादेखील म्हणावे असे प्रयत्न मंगळवेढा तालुक्यातील शिवसेनेचे पक्ष बांधणीसाठी झालेले पहायला मिळाले नाहीत. यामुळे सावंत यांच्या विचाराने नेमलेल्या पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी शिवसेनेच्या विचाराने काम करत असताना कशा पद्धतीने काम केले पाहिजे., याबाबतची माहिती नियुक्त केलेल्या पदाधिकार्‍यांना नसल्याने त्यांच्याकडून भरीव कामगिरी झालेली पहायला मिळाली नाही. त्यामुळे जुने निष्ठावंत शिवसैनिक पुन्हा एकदा शिवसेनेच्या कामाची पद्धत व विचारधारेशी प्रामाणिक असणार्‍या लोकांना काम करण्याची संधी मिळावी यासाठी श्रेष्ठींकडे गळ घालत आहेत.

मंगळवेढा तालुक्याचे तीर्थक्षेत्र विकास यासह उपसा सिंचन योजना, म्हैसाळचे पाणी यासारख्या महत्त्वपूर्ण प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी शिवसेना व विद्यमान राष्ट्रवादीचे लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून विद्यमान सरकारच्या काळात प्रश्न मार्गी लावण्याची जबाबदारी असणार असल्याने सध्या लवकरात लवकर तालुकास्तरीय पदाधिकार्‍यांच्या निवडी करणे गरजेचे झाले आहे.

लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीनंतर राज्यात जी परिस्थिती निर्माण झाली. त्यानुसार विभागवार मंत्रिपदाचे वाटप करण्यात आल्याने आ. तानाजी सावंत यांना महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात काम करण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे नाराज झालेल्या त्यांच्या समर्थकांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विरोधात घोषणाबाजी करत अनेक ठिकाणी राजीनामे दिले. नुकत्याच झालेल्या उस्मानाबाद येथील जिल्हा परिषदेच्या निवडीत सावंत गटाने भारतीय जनता पक्ष सोबत हात मिळवणी करत जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष पद मिळवल्याने उस्मानाबाद सोलापूर येथील शिवसैनिकांच्या मनात उद्रेक निर्माण झाला. त्याचे तीव्र पडसाद शिवसेनेच्या विभागातील निष्ठावंत शिवसैनिकांच्या मनावर झाल्याने शिवसेनेतून सावंत यांच्या हकालपट्टीची मागणी जोर धरू लागली. यावर तात्काळ मुंबई येथे बैठक पार पडली व सोलापूर जिल्हा प्रभारी म्हणून पुरुषोत्तम बरडे यांची निवड झाल्यानंतर आता प्रत्येक तालुक्यातील तालुकाप्रमुख सह इतर पदाच्या निवडीकडे शिवसैनिकांचे लक्ष आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
आईच्या डोळ्यादेखत त्याचा जीव गेला…ती काहीच नाही करू शकली

आईच्या डोळ्यादेखत त्याचा जीव गेला...ती काहीच नाही करू शकली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धनश्री अर्थकारणाच्या यशस्वी परंपरेचा तीन दिवस दिमाखदार सोहळा; शरद पवार व सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थीत संपन्न होणार प्रा.शिवाजीराव काळुंगे सर यांचा अमृतमहोत्सव

दुष्काळाचा बिमोड करण्यासाठी शेतकऱ्यांची वज्रमुठ; मंगळवेढ्यात गाजणार ३४ वी ‘पाणी संघर्ष परिषद; २६ जूनला दुष्काळग्रस्तांचा हुंकार

June 23, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

मोठी बातमी! मंगळवेढा तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजला; प्रारूप आरक्षण जाहीर होताच इच्छुकांची उडाली धावपळ; हरकती नोंदवण्यासाठी अवघे ‘इतके’ दिवस शिल्लक

June 23, 2026
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

भयंकर निष्काळजीपणा! डॉक्टरांच्या अनुपस्थितीत नर्सने केली प्रसूती; निष्पाप माता-बाळाचा बळी, चितेच्या राखेत पुरावा

June 22, 2026
बळीराजाला मोठा दिलासा! शेतकरी कर्जमाफीची घोषणा; देवेंद्र फडणवीसांची घोषणा; कोणाचे कर्ज होणार माफ?

शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी घोषणा! राजकारण की समाजकारण? मुख्यमंत्र्यांचे विरोधकांना थेट आव्हान; नेमका प्लॅन काय?

June 22, 2026
महिलांनो! बसने प्रवास करताय तर सावधान, मंगळवेढा बसस्थानकावरून महिला प्रवाशाचे १० लाख किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने हातोहात पळविले; स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दाखल

सावधान! मंगळवेढा बस स्टँडवर चोरटे सक्रिय; वृद्धेचे दागिने आणि रोकड लंपास, गुन्हा दाखल; प्रवाशांची सुरक्षा धोक्यात

June 22, 2026
​मंगळवेढ्यातील महिलांनो सावधान! मॉर्निंग वॉक दरम्यान शिक्षिकेसोबत घडला धक्कादायक प्रकार

​मंगळवेढ्यातील महिलांनो सावधान! मॉर्निंग वॉक दरम्यान शिक्षिकेसोबत घडला धक्कादायक प्रकार

June 21, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा