mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

मंगळवेढयात परजिल्हयातून 9 हजार 864 नागरिक झाले दाखल

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
मंगळवेढयात परजिल्हयातून 9 हजार 864 नागरिक झाले दाखल



मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । मंगळवेढा शहर व ग्रामीण भागात बाहेर जिल्हयातून दि.1 एप्रिल अखेर जवळपास 9

हजार 864 नागरिक आले असल्याची नोंद आरोग्य  विभाग तसेच नगरपालिका व ग्रामीण रुग्यालय यांच्याकडे झाली आहे. दरम्यान,बाहेरून आलेल्या नागरिकांची ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करून त्यांना घरी पाठविण्यात आले आहे.

कोरोना या संसर्गजन्य आजाराच्या पार्श्‍वभूमीवर  मंगळवेढा तालुक्यातील पाच प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत गावनिहाय घरोघरी जावून आरोग्य सेविका,आरोग्य सेवक,अंगणवाडी सेविका व मदतनीस,आशा आदींनी सर्व्हे केल्यानंतर बाहेरच्या जिल्हयातून  एक एप्रिलअखेर 9412 नागरिक मंगळवेढाच्या ग्रामीण भागात आले आहेत.

प्राथमिक आरोग्य केंद्र निहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे- आंधळगांव -1,981,सलगर बु-1,356,भोसे-2,427,बोराळे-1,517,मरवडे -2,131 असे एकूण 9412 नागरिक नव्याने सांगली,पुणे,कोल्हापूर,सातारा,मुंबई  आदी भागातून दाखल झाले आहेत. ग्रामीण रुग्णालयाकडे  दि.31 मार्च रोजी 13 नागरिक बाहेरून आल्याची नोंद झाली आहे.यामधील 7 नागरिक लोक कर्नाटक राज्यातील चिंचणी येथून आल्याचे सांगण्यात आले.

मंगळवेढा शहरात 8 लोकांच्या टिमने शहरात सर्व्हे केला असताना जवळपास बाहेरून 439 नागरिक आल्याची नोंद नगरपालिकेकडे झाली आहे. दरम्यान सध्या कोरोना या संसर्गजन्य आजाराने सर्वत्र थैमान घातले असताना मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयात व इतर प्राथमिक आरोग्य केंद्रात मास्क,सॅनिटायझर, किट,हँड ग्लोज व इतर साधने उपलब्ध नसल्याने वैद्यकीय अधिकार्‍यांना आपला जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा करावी लागत असल्याने तेथील डॉक्टरांचा जीव टांगणीला लागला आहे. शासनाने सद्याची असलेली गंभीर परिस्थिती लक्षात घेवून विविध साधनांचा पुरवठा करावा अशी मागणी होत आहे.दरम्यान यापुर्वी परदेशातून 8 जण आले असून त्यांना होम क्वारंटाईन्डमध्ये ठेवण्यात आले आहे.या आठजणांवर आरोग्य विभागाची करडी नजर आहे.

मंगळवेढयात कोरोना या संसर्गआजाराला टक्कर देण्यासाठी शासनाचे पाच अ‍ॅब्यूलन्स उपलब्ध आहेत. अ‍ॅब्युलन्समधील   डॉक्टर व  चालक यांना  किट संरक्षक व मास्क नसल्यामुळे यांना जीव धोक्यात घालून रुग्णांना सोलापूर अथवा अन्य ठिकाणी न्यावे लागत आहे.पाच अ‍ॅम्ब्युलन्स उपस्थित असताना केवळ एम एच 14 सी एल 0742 या अ‍ॅब्युलन्सला वारंवार कॉल देवून पाठविले जात असल्याचा आरोप डॉ.दत्तात्रय हजारे यांनी केला आहे.

सध्या उष्णता वाढत असल्याने ताप,सर्दी,खोकला किरकोळ स्वरूपात वाढण्याची शक्यता आहे. याला अटकाव करण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी लिंबू सरबत,थंड पाण्याऐवजी गरम पाणी प्यावे,शक्यतो थंड फ्रिजमधील पदार्थ टाळावेत,मास्क,सॅनिटायझर आदींचा वापर करावा.-डॉ.प्रमोद शिंदे,वैद्यकीय अधिक्षक,ग्रामीण रुग्णालय,मंगळवेढा.

मंगळवेढा शहरात  14 बेघर नागरिक आढळून आले आहेत.त्यापैकी 8 जण श्री दामाजी संस्था येथे तर 6 जणांची नगरपालिका शाळा नं. 1, नगरपालिका शाळा नं. 2,नगरपालिका शाळा नं. 4 या ठिकाणी  राहण्याची व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त बेघर नागरिक आणखी कोणाच्या निदर्शनास आल्यास त्यांनी नगरपालिका प्रशासनाकडे संपर्क साधावा.-पल्लवी पाटील,मुख्याधिकारी,न.पा.मंगळवेढा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: MangalWedha

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
मंगळवेढ्यात शिवभोजन केंद्राची पाच रुपयात जेवण योजना सुरुवात

मंगळवेढ्यात शिवभोजन केंद्राची पाच रुपयात जेवण योजना सुरुवात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

मोठी बातमी! उच्च न्यायालयाचा ३१५ ग्रामपंचायतींच्या सरपंचांना मोठा दिलासा; दिला अत्यंत महत्वाचा निर्णय

April 21, 2026
महसूल पंधरवाडा अंतर्गत आज बोराळे येथे शेती, पाऊस व दाखले मार्गदर्शन कार्यक्रम; शेती समस्या व उपाय, पावसाची अनियमितता, शेतकऱ्यांना देण्यात येणारे वेगवेगळे दाखले या विषयावर सखोल मार्गदर्शन

रक्त नात्यातील जमीन वाटणी पूर्णपणे मोफत; सातबारावरील हक्कासाठी शुल्क भरावे लागणार नाही; नेमका बदल असा, आधी काय आणि आता काय?

April 21, 2026
दहावी, बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल जाहीर, असा पहा निकाल

लेकींच्या शिक्षणाची चिंता मिटली! राज्य सरकारचा मोठा निर्णय; आता ‘हे’ शुल्कही होणार १०० टक्के माफ

April 21, 2026
धक्कादायक! मंगळवेढ्यात पतीचा पत्नीवर चाकू हल्ला; कारण वाचून थक्क व्हाल…पती विरूध्द गुन्हा दाखल

संतापजनक! वृद्ध आईला न सांभाळता लाथाबुक्क्यांनी मारहाण करून घराबाहेर दिले हाकलून; ‘या’ कायद्याअंतर्गत मुलाविरुद्ध गुन्हा दाखल

April 21, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

मोठी बातमी! गरिबांच्या टाळूवरचं लोणी खाणारे डॉक्टर एसीबीच्या कचाट्यात; मंगळवेढ्यात खळबळ

April 20, 2026
मोठी संधी! सोलापूर व मंगळवेढ्यात नामांकित बँकांसाठी काम करण्याची सुवर्णसंधी; 12 वी ते पदवीधर मुली व मुलांसाठी फिक्स पगार, आकर्षक कमिशन; 8090100191 करा संपर्क; आजच करा अर्ज

महिलांनो सावधान! ब्युटी क्रीम ठरतेय किडनीच्या गंभीर विकाराचे कारण; महाराष्ट्रात धक्कादायक प्रकार उघड

April 20, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा