मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
सोलापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यातील एकूण ९० गावांमध्ये विविध कारणांमुळे भविष्यात द्यावयाची नवीन रास्त भाव दुकाने व किरकोळ केरोसीन परवाने शासनाने दिलेल्या प्राथम्य क्रमानुसार मंजूर करण्यात आली आहेत.
इच्छुकांनी संबंधित तहसील कार्यालयात ता.३१ जुलैपर्यंत विहित नमुन्यात अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा पुरवठा कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.
सध्याची रास्तभाव दुकाने, किरकोळ केरोसीन परवाने तसेच ठेवून नवीन रास्त भाव दुकाने व किरकोळ केरोसीन परवाने मंजूर करण्यात येत आहेत. संबंधित गावातील ग्रामपंचायत किंवा स्थानिक स्वराज्य संस्था, नोंदणीकृत स्वयंसहाय्यता बचत गट,
नोंदणीकृत सहकारी संस्था, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम किंवा संस्था नोंदणी अधिनियम या कायद्याच्या अंतर्गत नोंदणी झालेल्या संस्था आणि महिला स्वयंसहाय्यता बचत गट व महिलांच्या सहकारी संस्थांना रास्तभाव
धान्य दुकान परवाना चालविण्याची इच्छा असेल, त्यांनी विहित नमुन्यात संबंधित तहसीलदार यांचे कार्यालय येथे ३१ जुलैपर्यंत विहित नमुन्यात अर्ज सादर करावेत.
तालुकानिहाय गावे व दुकाने
उत्तर सोलापूर तालुका
नान्नज, अकोलेकाटी व बीबी दारफळ, माढा तालुका उपळाई खुर्द व भीमानगर, मोहोळ तालुका – शेटफळ, शिरापूर (मो.) लांबोटी, विरवडे खु., वाघोलीवाडी, माळशिरस तालुका- माळशिरस दु.क्र.६, घुलेनगर, फोंडशिरस- दु.क्र.३९, फोंडशिरस दु. क्र. ४०, दहिगाव, कळंबोली, अकलूज दु.क्र.६१,
अकलूज दु.क्र.६२, अकलूज दु.क्र.६३ १०) अकलूज दु.क्र.६६ माळेवाडी, विझोरी, बागेचीवाडी, गिरझणी, संगम, गणेशगाव, श्रीपूर दु.क्र.१०२, विठ्ठलवाडी, खळवे, विजयवाडी व भांबुर्डी, करमाळा तालुका केडगाव, शेलगाव (वा), कविटगाव, चिखलठाण, गुलमोहरवाडी, कावळवाडी व बिटरगाव (वा), पंढरपूर तालुका – करकंब, सुगावभोसे, बिटरगाव पंढरपूर दु.क्र.६९५, पंढरपूर दु.क्र.८३ ६. पंढरपूर दु.क्र.८८७, कासेगाव
मंगळवेढा तालुका – खडकी, माळेवाडी व मंगळवेढा, अक्कलकोट तालुका कुमठे, कल्लहिप्परगे, नन्हेगाव, किणी, हालचिंचोळी, चपळगाव, कुरनूर, अक्कलकोट दु.क्र. १३ व नागनहळ्ळी.
दक्षिण सोलापूर तालुका
कुंभारी, बिरनाळ, राजुर, बसवनगर, भंडारकवठे, सादेपूर व चिंचपूर, बार्शी तालुका बार्शी दु.क्र.५, उपळाई नलवडेवाडी, (ठो.) दु. क्र. ३६, काळंबवाडी, काटेगाव कापसी, खडकलगाव, गुळपोळी, अंबाबाईची वाडी, पांगरी दु.क्र.८६ १०) पिंपळगाव (घस), बाभूळगाव, बोरगाव, तुळशीदासनगर, मालवंडी दु.क्र.१०४,
बार्शी दु.क्र. १४०, बार्शी दु. क्र. १५८, अरणगाव, सांगोला तालुका – बंडगरवाडी, व गुणापवाडी अशी एकूण जिल्ह्यात ९० रास्त भाव दुकाने आहेत.
श्रीपतपिंपरी दु.क्र. १६१, पांगरी १८९, उपळाई ठो. दु.क्र. १९३ व वाघाचीवाडी
सांगोला तालुका – बंडगरवाडी, व गुणापवाडी अशी एकूण जिल्ह्यात ९० रास्त भाव दुकाने आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज