मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । आजवर सेफ झोनमध्ये असणाऱ्या विजयपूर शहरात एका महिलेला कोरोना विषाणूची लागण झाल्याचे जिल्हाधिकारी एस . वाय . पाटील यांनी जाहीर केले आहे. यामुळे लोक भयभीत झाले आहेत . शहरातील छप्परबंद गल्लीत राहणाऱ्या ६० वर्षाच्या एका महिलेस कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे . ती महिला २५ जणांच्या एकत्रित कुटुंबात राहात होती.
आजवर विजयपूर जिल्ह्यातून पाठविलेल्या ११० जणांपैकी ८१ जणांचा स्वब चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे . गोलघुमट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बडी कमान , छप्परबंद , हरणशिकारी गल्ली , हकीम चौक , कामत हॉटेल आदी परिसर लॉकडाउन करण्यात आला आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज