मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
विवाहित महिलेचे अपहरण करून तिच्यावर वेळोवेळी दुष्कर्म करणाऱ्या पिंटू बापू मोहिते ( रा.कोळे ) येथील याला पंढरपूर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एन.के. मोरे यांनी १४ वर्षे सक्तमजुरी आणि ३५ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.
पीडित महिला ७ सप्टेंबर २०११ रोजी माहेर हुलजंती येथून आपल्या दोन वर्षांच्या मुलासह सासरी मारोळी येथे जाण्यासाठी मरिआई चौकात थांबली होती. तेथे आरोपी पिंटू बापू मोहिते तिला भेटला. दुचाकीवरून मारोळी येथे साडतो असे त्याने सांगितले.
महिला व तिचा पती कारंडेवाडी (ता .जत , जि . सांगली ) येथे ऊसतोडीसाठी गेले होते . यांनी तेथे पिंट मोहितेशी त्यांची ओळख झाली दोषारोपपत्र होती . त्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवून ती दुचाकीवरून निघाली . मात्र आरोपीने दुचाकी सांगोल्याकडे नेली याबाबत विचारणा केली असता गप्प बस नाहीतर ठार मारून टाकीन , अशी धमकी त्याने दिली .
सोबत लहान मूल असल्यामुळे गप्प राहिली . त्यानंतर आरोपींनी पीडित महिलेस मिरज तालुक्यातील बेडग या गावी नेऊन एका घरात ठेवले. तेथे तिच्यावर दुष्कर्म केले, अशी फिर्याद पीडित महिलेने मंगळवेढा पोलिस ठाण्यात दिली होती.
पोलिस निरीक्षक सुहास भोसले , हेडकॉन्स्टेबल नवनाथ देडे यांनी तपास करून आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले . सरकार पक्षातर्फे ५ साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या . सरकार पक्षातर्फे अॅड . सारंग वांगीकर यांनी बाजू मांडली . अपहरण , दुष्कर्म या गुन्ह्यात १४ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व ३५ हजार रुपये दंड अशी शिक्षा न्यायालयाने सुनावली . दंडाच्या रकमेतील २५ हजार रुपये पीडित महिलेला नुकसानभरपाई म्हणून द्यावी , असेही आदेश दिले आहेत.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज