मंगळवेढा : समाधान फुगारे
मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा मतदारसंघात शेवटच्या दिवशी अपक्ष उमेदवार समाधान आवताडे व रयतक्रांतीकडून माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करून अर्ज दाखल केला असून काँग्रेसचे शिवाजीराव काळुंगे व राष्ट्रवादीचे भारत भालके यांनी पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म वेळेत सादर केला आहे.
आज शुक्रवारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अपक्षस उमेदवार समाधान आवताडे यांनी दामाजी पंत, विठ्ठलाचे व ग्रामदेवतांचे दर्शन घेऊन मोठे शक्ती प्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
रयत क्रांती संघटनेकडून माजी आमदार सुधाकरपंत परिचारक अर्ज भरण्यासाठी रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत ,माढयाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर ,माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील,माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे,कल्याणराव काळे आदी प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत अर्ज भरला आहे.
गुरुवारी अर्ज दाखल केलेलं राष्ट्रवादीकडून भारत भालके व काँग्रेस मधून शिवाजीराव काळुंगे यांनी आज वेळेत पक्षाचा एबी फॉर्म निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला आहे.
सध्या तरी ही निवडणूक बहुरंगी होणार असल्याचे चित्र दिसत असले तरी अर्ज मागे कोण कोण घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिल.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज