मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
मंगळवेढा-पंढरपूरच्या जागेवरून कॉग्रेस आणि राष्ट्रवादीमधील वाद आता शिगेला पोचला आहे. कॉग्रेसच्या जागेवर राष्ट्रवादीने उमेदवार दिल्याने चिडून कॉग्रेस नेत्यांनी ही पंढरपूर मध्ये कॉग्रेस उमेदवाराला निवडणूकीच्या रिंगणात उतरवले आहे. या जागेवरून निवडणूक प्रचारा पूर्वीच राष्ट्रवादी व कॉग्रेसमध्ये घमासान सुरू झाले आहे.
कॉग्रेस कोणत्याही परिस्थितीत उमेदवारी मागे घेणार नाही, अशी भूमिका जिह्यातील कॉग्रेस नेत्यांनी घेतली आहे.त्यामुळे पंढरपुरात आघाडीतील बिघाडी महायुतीच्या पथ्यावर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पंढरपूर विधानसभा मतदार संघात यावर्षी कमालीची चुरस निर्माण झाली आहे.माजी आमदार सुधाकर परिचारकांच्या उमेदवारीमुळे निवडणूकीला रंगत आली आहे.
महायुतीने राजकारणातील मुरब्बी सुधाकर परिचारकांना उमेदवारी देत विरोधी पक्षाला मोठा धक्का दिला आहे. परिचारकांच्या विरोधात कॉग्रेस मधून राष्ट्रवादीत आलेल्या आमदार भारत भालकेंना उमेदवारी दिली आहे.
राष्ट्रवादीने कॉग्रेसच्या जागेवर उमेदवारी जाहीर केल्याने कॉग्रेसनेही शह देत जिल्हा कॉग्रेसचे उपाध्यक्ष शिवाजी काळुंगे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे.पंढरपुरात राष्ट्रवादी आणि कॉग्रेसने आपले उमेदवार दिल्याने येथील निवडणूकीत रंगत आणखी वाढली आहे. राज्यात कॉग्रेस, शेकाप आणि राष्ट्रवादीची आघाडी असतानाच मंगळवेढा-पंढरपूर,सांगोला आणि सोलापूर मध्य या तीन विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीने कॉग्रेस आणि शेकाप उमेदवारा विरोधात बंड पुकारले आहे.
अशातच मंगळवेढा-पंढरपूर मधून कोणत्याही परिस्थितीत कॉग्रेस आपली उमेदवारी मागे घेणार नाही अशी भूमिका कॉग्रेस उमेदवारासह जिल्हा युवक कॉग्रेसचे अध्यक्ष नितीन नागणे यांनी घेतली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवसा पर्यंत आणखी काय घडामोडी घडतात याकडेच कॉग्रेस आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचे लक्ष लागल आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज