टीम मंगळवेढा टाईम्स ।
स्पर्धेच्या युगात धनश्री परिवार व सिताराम परिवाराने लोकांमध्ये विश्वास निर्माण करून सहकार क्षेत्रात नावलौकिकता मिळवली आहे. हे खऱ्या अर्थाने धनश्री व सिताराम परिवारातील आर्थिक संस्थेचे यश आहे. असे प्रतिपादन सोलापूर जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांनी केले.
धनश्री परिवार व सिताराम परिवारातील श्री सदगुरू सिताराम महाराज अर्बन को- ऑप. क्रेडिट सोसायटी लि. मंगळवेढा या संस्थेचा उद्घाटन सोहळा शिवप्रेमी चौक, शिवालय शेजारी मंगळवेढा येथे ह.भ.प. जयवंत बोधले महाराज यांच्या शुभहस्ते पार पडला याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून कुंदन भोळे बोलत होते.
दरम्यान संस्थेत पहिल्याच दिवशी १ कोटी १ लाख ठेवी जमा झाल्या असून पहिल्याच दिवसात १ कोटीचा टप्पा पार करणारी मंगळवेढा तालुक्यातील एकमेव पहिलीच संस्था म्हणुन श्री सदगुरू सिताराम महाराज अर्बन को- ऑप. क्रेडिट सोसायटी लि. मंगळवेढा ही ठरली आहे.
याप्रसंगी मंगळवेढा उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील, सहाय्यक निबंधक प्रमोद दुरगुडे, दामाजी शुगरचे चेअरमन शिवानंद पाटील, व्हा. चेअरमन तानाजी खरात, उद्योजक वैभव नागणे, सांगोला सूतगिरणीचे माजी चेअरमन नानासाहेब लिगाडे,
माजी आमदार दत्तात्रय सावंत, भैरवनाथ शुगरचे कार्यकारी संचालक अनिल सावंत, डी.वाय. पाटील युनिव्हर्सिटीचे डायरेक्टर बी.एस. माने, भीमा शुगरचे व्हा. चेअरमन सतीश जगताप, रतनचंद शहा बँकेचे व्हा. चेअरमन रामचंद्र जगताप, जिजामाता परिवाराचे रामकृष्ण नागणे,
जकराया शुगरचे चेअरमन बिराप्पा जाधव, धनश्री व सिताराम परिवाराचे संस्थापक प्रा. शिवाजीराव काळुंगे, धनश्री मल्टीस्टेटचे व्हा. चेअमन युवराज गडदे, संचालक यादाप्पा माळी, धनश्री महिला पतसंस्थेच्या चेअरमन प्रा. शोभा काळुंगे, धनश्री मल्टीस्टेटच्या संचालिका उषा माने,
श्री सदगुरू सिताराम महाराज शुगरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजलक्ष्मी काळुंगे- गायकवाड, श्री सदगुरू सिताराम महाराज अर्बन सोसायटीचे व्हा. चेअरमन लक्ष्मण वाघमोडे, संचालिका राधिका पाटील, सीमाताई काळुंगे यांचेसह इतर मान्यवर उपस्थित होते.
पुढे कुंदन भोळे म्हणाले, सहकार क्षेत्रात कार्यरत असताना संचालक मंडळाने सर्व कायदेशीर बाबी समजून घेऊन बँकचे कामकाज करणे नितांत गरजेचे आहे. सभासदांच्या हिताचे निर्णय घेऊन वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी जास्तीत जास्त अत्याधुनिक सेवा-सुविधा देण्याचा प्रयत्न संचालक मंडळाचा मानस असावा.
सर्वसामान्य जनतेचे हित डोळ्यासमोर ठेवून आजपर्यंत धनश्री व सिताराम परिवाराने वाटचाल सुरू ठेवली आहे. एकीकडे देशाला आदर्श असणारे महाराष्ट्रातील सहकार क्षेत्र आज ग्रामीण विकासापासून ते राष्ट्रीय विकासापर्यंत आपली भूमिका स्पष्ट करताना दिसत आहे.
त्याचाच एक भाग मंगळवेढाच्या वैभवशाली विकासात धनश्री परिवारातील धनश्री महिला पतसंस्था व धनश्री मल्टीस्टेटचा मोठा हातभार आहे.
त्यामध्ये आणखी भर घालण्यासाठी शिवाजीराव काळुंगे व शोभा काळुंगे यांनी आपल्या सहकार्यासोबत ही नवीन श्री सदगुरू सिताराम महाराज अर्बन को- ऑप. क्रेडिट सोसायटी लि. मंगळवेढा संस्था उभा केली आहे. सर्वजण मनापासून कष्ट घेतात म्हणून अधिककाधिक व्यापारी आणि शेतकरी आपल्या संस्थेकडे वळाले आहेत.
ठेवीदार, कर्जदार, सभासद व ग्राहकांच्या विश्वासावरच धनश्री परिवार व सिताराम परिवाराने नावलौकिक मिळवला. असे गौवोद्गार काढत सोलापूर जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे यांनी धनश्री परिवार व सिताराम परिवाराचे अर्थिक क्षेत्रातील कामाचे कौतुक केले.
ह.भ.प. जयवंत बोधले महाराज म्हणाले, समाजकल्याणाच्या माध्यमातून लोककल्याणाचा मार्ग प्रशस्त करणारे सहकाराचा महामेरू म्हणजे प्रा.शिवाजीराव काळुंगे हे आहेत. केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे, यत्न तोचि देव जाणावा. प्रयत्न करा, कार्य करा, यश आपल्याला नक्की मिळेल.
या उक्तीप्रमाणे धनश्री परिवाराने मंगळवेढा तालुक्यामध्ये भरीव योगदान दिले आहे. असे सांगत त्यांनी संत तुकाराम महाराज यांच्या अभंगातील ओवीचा दाखला देत जोडोनिया धन उत्तम व्यवहारे…
संत तुकाराम महाराजांनीही परमार्थ सांगताना जीवनार्थ सोडून द्यायला सांगितला नाही. धन जमविलेच पाहिजे. केवळ ते उत्तम मार्गाने मिळवावे, असा उपदेश अभंगातून केला आहे. जे धन तुम्ही जोडणार आहात ते उत्तम व्यवहारातून जमविलेले असावे. असे संत वाणीचे विविध दाखले देत धनश्री परिवार व सिताराम परिवाराचे अर्थिक व सहकार क्षेत्रातील कामाचे कौतुक केले.
याप्रसंगी माजी आमदार दत्तात्रय सावंत, मंगळवेढा उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील, प्रा शिवाजीराव काळुंगे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री सदगुरू सिताराम महाराज शुगरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजलक्ष्मी काळुंगे- गायकवाड यांनी केले.
यावेळी जिल्हा नियोजन मंडळ समितीचे सदस्य अजित जगताप, दामाजी शुगरचे संचालक गौरीशंकर बुरकुल, बाळासाहेब गडदे, अमोल कोरके, पंडीत भोसले, प्रभाकर कलुबर्मे, अविनाश चव्हाण, माऊली काळे, धर्मराज खेडेकर,ॲड. शैलेश हावनाळे, ॲड. दत्तात्रय सरडे, सतीश दत्तु, प्रकाश काळुंगे, लहू ढगे, औदुंबर वाघ, महादेव शिखरे,
श्री सद्गुरू सिताराम महाराज शुगरचे कार्यकारी संचालक हणमंत पाटील, श्री सदगुरू सिताराम महाराज अर्बन सोसायटीचे संचालक बबन सरवळे, सागर मिसाळ, संजय चौगुले, राजेंद्र वाघमारे, ज्ञानेश्वर कांबळे, चंद्रकांत वेदपाठक,
धनश्री महिला पतसंस्थेच्या सरव्यवस्थापिका सुनिता सावंत, धनश्री मल्टीस्टेटचे सरव्यवस्थापक रमेश फडतरे यांचेसह धनश्री महिला पतसंस्थेतील व धनश्री मल्टीस्टेटचे सर्व शाखाधिकरी,
श्री सदगुरू सिताराम महाराज शुगरचे सर्व विभाग प्रमुख तसेच पंढरपूर, मंगळवेढा व सांगोला या भागातील सभासद व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी इंद्रजित घुले व अक्षय टोमके यांनी केले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज