टीम मंगळवेढा टाईम्स ।
चंद्रभागेच्या नदी पात्रात बुडणाऱ्या मित्राला वाचविण्याच्या प्रयत्नात एका युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पंढरीत घडली. श्रीयश भारत भादुले (वय २१, रा. पंढरपूर ) असे त्या युवकाचे नाव आहे. बुधवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
सध्या सोलापूर शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी उजनी धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे चंद्रभागा दुथडी भरून वाहत वाहत आहे.
उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे शहरातील अनिल नगर परिसरातील श्रीयश भादुले व त्याचे काही मित्र दुपारी चार वाजण्याच्या सुमारास चंद्रभागेत पोहण्यासाठी गेले होते.
यावेळी पाण्याच्या प्रवाहात त्याचा मित्र बुडत असल्याचे श्रीयशच्या लक्षात येताच त्याने मित्राला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र पाण्याचा प्रवाह वेगवान असल्याने श्रीयशचा वाहून गेला या दरम्यान श्रीयशचा मित्र वाचला, परंतु पाण्यात बुडून श्रीयश ला जीव गमावावा लागला.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज