टीम मंगळवेढा टाईम्स । लग्न जमत नसल्याने दारूचे व्यसन लागलेल्या 35 वर्षीय इसमाने घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तांबोळे तालुका मोहोळ येथे दिनांक 29 मे रोजी उघडकीस आली असून सयाजी दत्तात्रय मोहिते असे त्या मृताचे नाव आहे.
याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सयाजी मोहिते आपल्या कुटुंबासमवेत तांबोळे तालुका मोहोळ येथे राहत होता. त्याचे लग्न जमत नसल्याने दारूचे व्यसन लागले होते. त्यातून तो ताण तणावात होता. दिनांक 28 मे रोजी रात्री अकरा वाजण्याच्या दरम्यान तो घरी दारू पिलेल्या अवस्थेत आला. त्यानंतर तो स्वतःच्या खोलीत जाऊन झोपला.
दुसर्या दिवशी सकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान आई गंगा या चहा पिण्यासाठी सयाजी याला उठवण्यासाठी गेले असता त्याने हाताच्या लोखंडी अँगल ला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी भाऊ मोहन मोहिते यांनी पोलीस ठाण्यात खबर दिली असून अधिक तपास पोलीस करत आहेत.
Mohol Youth commits suicide due to lack of marriage
—————————–
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज