mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

पिंपळगाव इथला एक जवान शहीद ; जम्मूमध्ये दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
November 27, 2020
in राष्ट्रीय
कोल्हापूर जिल्ह्यातील सुपुत्र ऋषीकेश जोंधळे पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात शहीद

जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये आणखी एका महाराष्ट्राच्या पुत्राला वीरमरण आलं आहे. चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगाव इथला एक जवान शहीद झाला असल्याची माहिती समोर येत आहे.

जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्यात दोन जवानांना वीरमरण आलं. एक जवान चाळीसगाव तालुक्यातील असल्याचं सांगण्यात येत आहे.

अधिक माहितीनुसार, यश दिगंबर देशमुख असं शहीद जवानाचं नाव आहे. यश हे अवघ्या 20 वर्षांचे होते.अगदी वर्षभराआधीच ते सैन्यदलात भरती झाले होते. ट्रेनिंगनंतर जम्मू काश्मीर इथं त्यांना तैनात करण्यात आलं. आज दुपारी आपलं कर्तव्य बजावत असताना त्यांना वीरमरण आलं.

यश देशमुख यांना आधीपासूनच सैन्य दलाचं आकर्षण होतं. त्यासाठी त्यांनी खूप परिश्रम घेत आणि सैन्य दलात भरती झाले होते. त्यामुळे त्यांच्या अशा जाण्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे.

यश देशमुख यांच्या पश्चात त्यांचे आई-वडील आणि एक भाऊ असं कुटुंब आहे. यश हे आज दुपारी 2 वाजता शहीद झाल्याची माहिती कळताच संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे आपला लेक देशासाठी शहीद झाला आहे हे अद्याप त्यांच्या आई-वडिलांना सांगण्यात आलं नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, तहसीलदार अमोल मोरे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मृत यश दिगंबर देशमुख शहीद झाल्याची महिती त्यांना मिळाली असून यश देशमुख यांचे पार्थिव मूळ गावी कधी आलं जाईल याबाबत अजून कुठलीही माहिती देण्यात आली नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, यश यांच्या जाण्याची बातमी कळताच संपूर्ण पंचक्रोशीत दु:खाचा डोंगर कोसळला आहे. शहीद जवानांच्या पार्थिवाच्या दर्शनाची आता सगळ्यांना ओढ लागली आहे.

यश यांच्या बातमीमुळे पीपळगाव शोकसागरात बुडालं आहे. एकही चूल गावात पेटली नसून दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्याचा सर्वत्र निषेध करण्यात येत आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: जवान शहीद

संबंधित बातम्या

सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय; ‘या’ एका कागदपत्राची सक्ती कायमची रद्द; लाखो विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी

June 27, 2026
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

भयंकर निष्काळजीपणा! डॉक्टरांच्या अनुपस्थितीत नर्सने केली प्रसूती; निष्पाप माता-बाळाचा बळी, चितेच्या राखेत पुरावा

June 22, 2026
Gas booking Number : आता गॅस बुकिंगसाठी संपूर्ण देशात एकच नंबर; जूना नंबर करा डिलिट

मोठी बातमी! घरगुती गॅस सिलेंडर आणखी महाग होणार; केंद्र सरकारनं सांगितलं त्यामागचं मोठं कारण..

June 9, 2026
मोठी बातमी! केंद्र सरकारचा ऊस उप्तादक शेतकऱ्यांना दिलासा, महिला सुरक्षेवर भर, मोदी कॅबिनेटमधील पाच मोठे निर्णय

मोदीजी! सामान्यांनी जगायचं कसं? ​‘अच्छे दिन’ कुठे गेले? महागाईने गाठला उच्चांक; काँग्रेसची महागाई हटवण्यासाठी भाजपला आणले, पण आता जनतेवरच ‘महागाईचा सर्जिकल स्ट्राईक’

June 8, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

तरुणपणी गोळी झाडली, म्हातारपणी शिक्षा झाली, 85 वर्षीय वृद्धाला 34 वर्षांनी कारावासाची शिक्षा; नेमकं प्रकरण काय?

June 5, 2026
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

धडाधड गोळीबार, सहा जणांचा मर्डर! मंगळवेढा तालुक्याच्या शेजारील राज्यात साऊथ सिनेमाला लाजवेल असं मन विचलित करणारं हत्याकांड; रस्ता रक्ताने माखला, हत्येचं कारण समोर

May 30, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

स्कॉर्पिओमध्ये माजी सरपंच, झेडपी सदस्य पत्नी, आई आणि भाचीसह चार जणांना जिवंत जाळलं; पहिल्यांदा अपघाताचा बनाव, पण.. थरकाप उडवणारी घटना समोर

May 29, 2026
मोठी बातमी! केंद्र सरकारचा ऊस उप्तादक शेतकऱ्यांना दिलासा, महिला सुरक्षेवर भर, मोदी कॅबिनेटमधील पाच मोठे निर्णय

नागरिकांनो! पुढील वर्षभर सोनं खरेदी करू नका, पेट्रोल डिझेल जपून वापरा, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले जनतेला आवाहनं, कारण काय?

May 11, 2026
मोठी बातमी! केंद्र सरकारचा ऊस उप्तादक शेतकऱ्यांना दिलासा, महिला सुरक्षेवर भर, मोदी कॅबिनेटमधील पाच मोठे निर्णय

पश्चिम बंगालमध्ये सत्ता येताच पीएम मोदींचा मास्टर स्ट्रोक; ‘या’, योजनेला दिली मंजूरी, नागरिकांना होणार मोठा फायदा

May 5, 2026
Next Post

कौतुकास्पद! पदवीधर मतदारांनी सामाजिक संदेश देत साजरा केला नीता ढमालेंचा वाढदिवस

ताज्या बातम्या

भयंकर! दूध डेअरी चालकास ‘या’ कारणांसाठी झाला सव्वा दोन लाखाचा दंड

घरात चालायची दुधात डिटर्जंट, युरिया आणि रसायनांची भेसळ, रंगेहात पकडले; तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई

July 19, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

खळबळ! ऊसतोड मजूर, बालविवाह अन् दोन अपत्ये… मंगळवेढ्यातील ‘त्या’ धक्कादायक प्रकाराने पोलीसही चक्रावले

July 19, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मंगळवेढ्यात सुन्न करणारी घटना! ११ वर्षांच्या चिमुरडीने शेतात जाऊन संपवलं जीवन; कारण…

July 18, 2026
पिकांना दिलासा! सोलापूर जिल्ह्यात परतीच्या पावसाचा हाहाकार, ‘या’ तालुक्यात वीज पडून महिला व तरुण ठार; ४ शेळ्या दगावल्या

महाराष्ट्रावर आस्मानी संकट! ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाचा मोठा अलर्ट

July 18, 2026
मोठी बातमी! सोलापूर व माढा मतदारसंघात ‘या’ तारखेला होणार मतदान; महाराष्ट्रात कोणत्या मतदारसंघात कधी मतदान?, 4 जूनला निकाल

दसरा-दिवाळी दरम्यान ग्रामपंचायतींसाठी निवडणूक! सरपंच निवड थेट जनतेतून; ४ ऑगस्टला अंतिम होणार मतदार याद्या; निवडणुकीसाठी वापरली जाणार ‘या’ तारखेची मतदार यादी

July 18, 2026
अंगणवाडी सेविकांची निघाली भरती, सोलापूर जिल्ह्यात ‘एवढ्या’ जागा; शिक्षण अट, उमेदवार निवडीचा अधिकार, अर्ज प्रक्रिया सविस्तर माहिती जाणून घ्या..

महिलांनो! सोलापूर जिल्ह्यात अंगणवाड्यांमध्ये नोकरभरती; पगार, पात्रता ते अर्जाचा शेवट दिवस; जाणून घ्या सर्व माहिती

July 17, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा