टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा तालुक्यातील शिरशी येथील विकास विष्णू गायकवाड ( वय २३ ) या तरूणाने अज्ञात कारणावरून लिंबाच्या झाडाला अंगातील शर्टाने गळफास घेवून आत्महत्या केली. Young man commits suicide by strangulation for unknown reasons
या घटनेची आकस्मात मयत अशी पोलिसात नोंद झाली आहे. पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी , दि.५ रोजी सकाळी ८.१५ च्या सुमारास गोणेवाडी येथील विकास गायकवाड याने कोणत्या तरी अज्ञात कारणावरून मंगळवेढा ते घेरडी जाणाऱ्या रोडच्या शेजारी असलेल्या हटसन कंपनीशेजारी असलेल्या लिंबाच्या झाडाला अंगातील शर्टाने गळफास घेवून आत्महत्या केली.
आत्महत्येचे कारण अस्पष्ट असल्याने पोलिसांनी व्हिसेरा राखून ठेवला आहे.अधिक तपास पोलिस नाईक दत्तात्रय येलपले हे करीत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज