मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
भैरवनाथ शुगर उद्योग समूहाचे व्हा. चेअरमन अनिल दादा सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त आज सोमवार दि.19 मे रोजी दुपारी 4 वाजता सलगर ब्रु. येथे भव्य जंगी कुस्त्यांचे मैदान संपन्न होणार असल्याची माहिती आयोजक चंद्रकांत देवकर यांनी दिली.
या कुस्त्यांच्या मैदानात पै.धनाजी कोळी पुणे व पै.राघू ठोंबरे कोल्हापूर यांची एक लाखांची तर महिला गटात पै.सई फडतरे मंगळवेढा व पै.रोहिणी माळी परांडा यांच्या शेवटच्या कुस्ती हे या कुस्ती स्पर्धेचे प्रमुख आकर्षण राहणार आहे.
पुरुष गट कुस्ती
पै.शुभम माने पुणे व पै.किरण मिसाळ अकलूज यांची 75 हजारांची, पै.परमेश्वर गाडे बामणी व पै.बाळकृष्ण शेळके कोल्हापूर यांची 50 हजारांची,
पै.सौरभ घोडके मंगळवेढा व पै.श्रीकांत खरात वाखरी यांची 35 हजारांची, पै.समर्थ चौरे पेनूर व पै.कृष्णदेव बनसोडे जामगाव यांची 25 हजारांची,
पै.चैतन्य बोराडे तळसंगी व पै.समाधान ओमने मंगळवेढा यांची 15 हजारांची तर पै.सुर्या अभंगराव वाखरी व पै.ओंकार हजारे खर्डी यांची 10 हजारांची कुस्ती होणार आहे.
महिला गट
पै.श्रुती गेजगे मंगळवेढा व पै.श्रावणी हजारे मंगळवेढा यांची 40 हजारांची, पै.श्रेया गेजगे मंगळवेढा व पै.सोनम जाधव पंढरपूर यांची 30 हजारांची,
पै.अनन्या हिंगमिरे मंगळवेढा व पै.मंजिरी जाधव पंढरपूर यांची 20 हजारांची, पै.आदिती हिंगमिरे मंगळवेढा व पै.गौरी भोसले सरकोली यांची 10 हजारांची तर पै.पायल गवळी मंगळवेढा व पै.श्रुती पाटील एकलासपूर यांची 5 हजारांची कुस्ती होणार आहे.
या कुस्त्यांचे संयोजक अनिलदादा मित्र परिवारातील इंद्रजित पवार, चंद्रकांत देवकर, अशोक निकम, तानाजी चव्हाण यांनी केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज