टीम मंगळवेढा टाईम्स । दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव तांडा येथील एका गरोदर महिलेचा प्रसुतीनंतर मृत्यू झाला आहे. याबाबत सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे. Woman dies after delivery at Mulegaon Tanda in Solapur
सविता शशिकांत राठोड (वय २९) असे त्या मृत महिलेचे नाव आहे. सविता राठोड या नऊ महिन्याचे गरोदर असल्याने त्यांना मुळेगाव तांडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात बाळपणासाठी दाखल करण्यात आले.
त्या ठिकाणी त्यांचे बाळपण झाल्यानंतर त्याचा अशक्तपणा वाटत असल्याने आणि रक्तस्त्राव चालू असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना सोलापूर येथील सिव्हील हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. मात्र , त्या उपचारापूर्वीच मयत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज