मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
मंगळवेढ्यासह राज्यभरात सध्या मोठ्या प्रमाणात डोळे येण्याची साथ आली आहे. हजारो रुग्ण या साथीने त्रस्त झाले आहेत. मंगळवेढ्यातही खासगी आणि सरकारी रुग्णालयात डोळे येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे.
डोळे येणे हा आजार खूप गंभीर स्वरूपाचा समजला जात नाही; पण तो संसर्गजन्य असल्याने, डोळ्यांसारख्या नाजूक अवयवांवर त्याचा परिणाम होत आहे. तो बरा व्हायला बराच कालावधी लागत असल्याने तो होऊ नये याची काळजी घेणे योग्य आहे.
लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत प्रत्येक वयोगटात हा आजार दिसून येतो. या आजाराचा संसर्ग हवेतून पसरत नसून तो स्पर्शातून पसरतो. डोळे येण्याची लक्षणे प्रथमतः एका डोळ्यात दिसतात आणि नंतर दोन्ही डोळ्यांना त्याचा त्रास होण्यास सुरुवात होते. हा संसर्ग हवेतून नाही तर स्पर्शातून पसरतो.
यामध्ये डोळे लाल होतात, त्यामधून चिकट स्राव येतो. कदाचित यामुळे हलकासा तापही येऊ शकतो, अशी ही याची लक्षणे आहेत.
हे इन्फेक्शन बॅक्टेरियल (जिवाणू), व्हायरल (विषाणू) किंवा ॲलर्जी यापैकी एका कारणामुळे होऊ शकते. परंतु सध्याचे इन्फेक्शन हे ॲडिनो व्हायरसमुळे होत असल्याचे ससूनमधील प्रयोगशाळेच्या तपासणीत समोर आलेले आहे. ही साथ संसर्गजन्य असल्याने रुग्णांना सर्व कामकाज सोडून घरामध्ये विभक्त व्हावे लागत असल्याने त्यांचे आर्थिक नुकसान देखील मोठ्या प्रमाणात होत आहे.
-डोळे आल्यानंतर काय करावे?
डोळे आल्यानंतर ते बरे होण्यासाठी साधारणपणे दोन आठवड्यांचा कालावधी लागताे. आजार बरा होण्यासाठी शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीला पूरक औषधे डॉक्टर देतात. डोळ्यांत टाकण्यासाठी ड्राॅप देतात. तसेच ताप किंवा तत्सम काही लक्षणे असतील त्यावरही काही औषधे दिली जातात. ते वापरण्याबराेबरच कॉन्टॅक्ट लेन्सचा वापर टाळावा. घरामध्ये टॉवेल, रुमालाचा वापर करावा. आजार संसर्गजन्य असल्यामुळे सार्वजनिक ठिकाणी जाणे पूर्णपणे टाळावे.
-स्वच्छतेची विशेष काळजी घ्या
राज्यात डाेळे येण्याच्या आजाराची तीव्रता खूप आहे. आजार गंभीर स्वरूपाचा गणला जात नसला तरी यामुळे डोळ्यांना इन्फेक्शन होण्याची शक्यता दाट आहे. त्यामुळे आजाराची लक्षणे जाणवू लागल्यास तज्ज्ञ डॉक्टरांशी संपर्क करून औषधोपचार चालू करा. स्वतःच्या स्वच्छतेची विशेष काळजी घ्यायला हवी. – डॉ.निनाद नागणे, वरद नेत्रालय, मंगळवेढा
आय फ्लूपासून वाचण्यासाठी अशी घ्या काळजी…
वैयक्तिक स्वच्छता ठेवणे
वारंवार हात धुणे
डोळ्यांना स्पर्श करणे टाळणे
आय फ्लू झाल्यास रुग्णांचे घरातच विलगीकरण करणे
परिसर स्वच्छता ठेवून माशा, मच्छर आणि चिलटांचे प्रमाण कमी करणे
आय फ्लू झाल्यास कोणती लक्षणे जाणवतात?
आय फ्लूमुळे डोळे लाल होतात
डोळ्यांतून वारंवार पाणी येणे
डोळ्यांना सूज येणे
डोळ्याला खाज येणे,
डोळ्यांतून घाण बाहेर पडणे,
पापण्यांवर सूज येणे अशी लक्षणे दिसून येतात.
घरगुती उपचार कसे करावेत?
आयफ्लू झाल्यात तुम्ही काही घरगुती उपाय देखील करू शकता. सुरुवातीला लक्षणे दिसताच घरगुती उपाय म्हणून स्वच्छ कापूस कोमट पाण्यात बुडवून ओला करा आणि त्याने डोळे पुसावे. यामुळे डोळ्यातील इन्फेक्शन बऱ्यापैकी कमी होऊ शकतं. याशिवाय कापूर जाळून धूरी करू शकता. यामुळे डोळ्यातील घाण अश्रूंवाटे बाहेर पडण्यास मदत होते. तसेच एरंडेल तेल काजळासारखे डोळ्याला लावल्याने डोळ्यातील घाण बाहेर पडते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज