टीम मंगळवेढा टाईम्स । डीपी दुरुस्तीसाठी दीड हजार रूपयांची लाच घेणाऱ्या वायरमनला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.
कांदा लावगडीसाठी पाणी लागणार होती, पंरतु वीजेची समस्या असल्याने तक्रारदाराने वायरमनकडे बाणेगाव येथील डीपी दुरुस्तीची मागणी केली.
त्यावेळी वायरमन सुभाष दत्तात्रय हिप्परगी ( बाणेगाव , म हावितरण शाखा कार्यालय कारंबा ) याने सर्व शेतकऱ्यांकडून पाच हजार रुपयांची लाच मागितली.
ठरलेल्या रकमेतील दीड हजार रुपये घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने हिप्परगीला रंगेहाथ पकडले. तालुका पोलिस ठाण्यात त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई ऍन्टी करप्शन ब्युरोचे उपअधिक्षक संजीव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक कविता मुसळे यांच्या पथकाने केली.
Wireman caught taking bribe from farmers for DP repair in Solapur caught in bribery trap
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज