टीम मंगळवेढा टाईम्स । गहू खाण्याचे प्रमाण वाढत गेल्याने ज्वारी, बाजरी, नाचणी यासारख्या धान्याचा आहारातील वापर कमी झाला आहे. ही पिके आरोग्यासाठी महत्त्वाची असून, त्यातील बाजरी या धान्याचे फायदे अधिक आहेत.
त्यातच सध्या कोरोनाचा व्हायरसचा प्रादुर्भाव असल्याने अंडी खाण्याचे प्रमाण वाढले आहे. परंतु, बाजरीची भाकरी देखील तितकीच उपयुक्त आणि कोरोना आजारावर गुणकारी मानली जात आहे.
एकेकाळी कोरडवाहू पिकांमध्ये बाजरी हे महत्त्वाचे पीक होते. बाजरी ही सोलापूर जिल्ह्याच्या काही पट्ट्यात अधिक प्रमाणात पेरली जाते. मुख्य म्हणजे बाजरीचे उत्पादन घेण्यासाठी लागणारा खर्च हा गहू पिकापेक्षा कमी आहे.
महाराष्ट्रात बाजरीचा वापर प्रामुख्याने भाकरीच्या स्वरूपात केला जातो. बाजरी गरम असल्याने प्रामुख्याने हिवाळ्याच्या दिवसात बाजरीची भाकर खालली जात असते. हॉटेल, ढाब्यांवर देखील बाजरीची भाकरी सहज उपलब्ध होत असते.
पण भाकरी खाण्यासोबतच त्यापासून लाडू, उपमा, पकोडे, थालीपीठ, खिचडी, डोसा असे अनेक रुचकर पदार्थ बनवणे शक्य आहे.
बाजरीत असे आहेत घटक
मराठीत बाजरी म्हटल्या जाणाऱ्या धान्याचे शास्त्रीय नाव पेन्निसेटम ग्लॅकम आहे. बाजरीच्या दाण्यात ओलावा (आर्द्रता) अठरा टक्क्यांपर्यंत असते.
याशिवाय कर्बोदके २५ टक्के, फायबर १७ टक्के, प्रथिने २२ टक्के, उष्मांक ७५६ किलो कॅलरीज, जीवनसत्त्व बी ६ – ७६८ मायक्रो मि.ली., जीवनसत्त्व ई १०० मायक्रो मि.लि., कॅल्शियम १६ मि.लि., लोह ६ मि.लि., मॅग्नेशियम २२८ मि.लि. ग्रॅम असते.
बाजरीची उपयुक्तता
बाजरी ही उत्तम ऊर्जा स्रोत (३६१ किलो कॅलरी) असून, त्यात गहू व तांदूळ यापेक्षा अधिक ऊर्जा असते. प्रथिने, जीवनसत्त्वे, कॅल्शियम, जीवनसत्त्व बी ६ अधिक प्रमाणात आहेत.
बाजरीमध्ये काही घटकांमुळे शरीरातील स्निग्ध पदार्थाचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. परिणामी हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. बाजरीमध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम यांचे प्रमाण जास्त असून, त्यामुळे रक्तपुरवठा नियमित होण्यास मदत होते.
बाजरीमध्ये फायबर (तंतुमय पदार्थ) अधिक असून, ते पचनक्रियेसाठी मदत करतात. बाजरीच्या नियमित सेवनामुळे शरीरातील हाडे मजबूत होतात. मधुमेही व्यक्तींसाठी बाजरीची भाकरी लाभदायी ठरते. ज्या व्यक्तींना आम्लपित्तांचा त्रास आहे, त्यांच्यासाठीही बाजरी उपयुक्त ठरते.
बाजरीची भाकर कोरोनावर गुणकारी
‘डब्ल्यूएचओ’ने नुकताच स्पष्ट केले आहे की, कोरोनाच्या काळात गरम वस्तू खाणे कधीही फायद्याचे आहे. त्यामुळे आपल्या खाण्या पिण्याच्या सवयी बदलल्या पाहिजे. यात काही तंज्ञ डॉक्टरांच्या मते बाजरी खाणाऱ्या माणसाला सहसा कोरोना होत नाही. कारण बाजरी हे धान्य गरम असते.
बाजरीची भाकरी खाल्ल्याने शरीरात ऊर्जा आणि गर्मी बनून राहते; त्यामुळे कोरोनाची सहसा लागण होत नाही. जरी कोरोना झालाच तर बाजरीमधील टॉर्चमुळे आणि बाजरीतील गर्मीमुळे शरीरात अँटी बॉडीज तयार होतात. परिणामी रुग्णाला रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यावर सुद्धा काही एक होत नाही.
म्हणून खेड्यातील बाजरी खाणारे लोक हे नेहमी सुदृढ राहतात. तरी देखील नुसते बाजरी खाल्ली म्हणून कोरोना होणार नाही; यावर अवलंबून न राहता बाहेर पडताना आपली काळजी घेणे आवश्यक आहे.
बाजरीचा घाटा सर्दीसाठी फायद्याचा
बाजरीची भाकर खाणे शरीरासाठी उपयुक्त आहे. यासोबतच बाजरीच्या पिठाचा घाटा पिल्यास सर्दीपासून दिलासा मिळण्यास मदत होते.
सर्दी होवून नाक जाम झाल्यास किंवा नाकातून पाणी वाहत असल्यास बाजरीच्या पिठाचा गरम घाटा पिणे फायद्याचे आहे. गरम पाण्यात बाजरीचे पिठ टाकून त्यात थोडा गुळ, मिरे कुटून टाकावे ते दहा मिनिटांपर्यंत उकडल्यावर गरम घाटा पिणे शरीरासाठी उपयुक्त आहे.(सकाळ मीडिया)
Why millet bread is useful on corona, there are other benefits
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज