टीम मंगळवेढा टाईम्स ।
आक्रोश मोर्चाचे नेतृत्व कोणीही करो, आरक्षणासाठी मन मोठे करावे लागेल अशी प्रतिक्रीया मंगळवेढा तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे चेअरमन सिद्धेश्वर आवताडे यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे दिली आहे.
मराठा समाज गेली कित्येक वर्ष स्वतःच्या हक्काचे आरक्षण मिळवण्यासाठी संघर्ष करीत आहे. त्यासाठी मराठा समाजाने विविध प्रकारची आंदोलने केली, निवेदन दिले.
न भूतो न भविष्यतो असे व संपूर्ण देशानेच नव्हे तर जगाने आदर्श घ्यावा असे लाखोंच्या संख्येने ५८ मूक मोर्चे अतिशय मोठ्या प्रमाणावर यशस्वीपणे व शांततेत काढून ही दाखविले.
परंतु राजकारणाच्या चक्रव्यूहात अडकलेले हे मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकू शकले नाही आणि त्यानंतर मात्र राज्य सरकार आणि केंद्र सरकार अशा दोन गटांमध्ये मराठा समाज विभागला गेला.
खऱ्या अर्थाने मराठा आरक्षण मिळवायचे असेल तर मराठा समाजाने राज्य सरकार व केंद्र सरकार असे विभागलेले न जाता एक जुटीने मोठ्या प्रमाणामध्ये लढा उभा करावा लागेल. परंतु वास्तवात मात्र तसे घडताना दिसत नाही.
आज नरेंद्र पाटलांनी घेतलेली मराठा समाजाची बैठक असो किंवा युवराज संभाजीराजे यांच्या राजकारण विरहीत भूमिकेला पाठिंबा देण्यासाठी मी स्वतः केलेले एक दिवसीय लाक्षणिक उपोषण असो.
ठराविक लोक वगळता एकदिवसीय लाक्षणिक उपोषणला अनेक मराठा पदाधिकारी असतील मराठा नेतेमंडळी असतील यांनी या लाक्षणिक उपोषणाकडे पूर्णपणे पाठ फिरवलेली अनुभवयास आली.
अनेक मंडळी तर उपोषणाच्या समोरून जाऊन देखील उपोषणाकडे फिरकले देखील नाहीत. असो मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढ्यासाठी पुढाकार कोणी ही घेत असले तरी संकोचित वृत्ती न दाखिवता , कोणतेही राजकारण न करता , गट – तट न पाहता.
मी माझ्या सहकाऱ्यांनीशी त्यामध्ये उस्पूर्त पणे सहभागी असेन कारण राजकारणाच्या वेळेस राजकारण आणि इतर वेळेस राजकारण विरहित समाजकारण हीच शिकवण आदरणीय बबनरावजी अवताडे यांच्याकडून आम्ही घेतलेली आहे.
आणि याच विचाराचा एक भाग म्हणून आम्ही दामाजी मंदिरात मराठा समाजाचा अंदोलन बैठकीस उपस्थिती राहिलो होतो.
अशाच पद्धतीची भूमिका सर्व मराठा बांधवांनी विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच मोठ मोठ्या नेत्यांनी घ्यावी हीच. अपेक्षा मंगळवेढा शहरातील व तालुक्यातील मराठा बांधवांची नक्कीच असेल तर आणि तरच आपण ही आरक्षणाची लढाई जिंकू शकू असे आवताडे यांनी त्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज