मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । देशभरातील कोरोनाचा फैलाव आटोक्यात येण्याची लक्षणे दिसत नसल्यामुळे केंद्र सरकारने 31 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा केली. लॉकडाऊनचा हा चौथा टप्पा असेल. त्याआधी महाराष्ट्र सरकारनेही अधिसूचना काढून लॉकडाऊन आणखी 14 दिवसांनी वाढवण्यात आल्याचे घोषित केले. अर्थात हा लॉकडाऊनदेखील आधीच्या लॉकडाऊनप्रमाणे कडक राहणार असला तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या आश्वासनानुसार पाच महत्त्वाच्या सवलती लॉकडाऊनच्या या चौथ्या टप्प्यात देण्यात आल्या आहेत. त्या अशा- लॉकडाऊन-4 नवीन रूपात देशवासीयांसमोर येईल, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्वीच केली होती.
1️⃣ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विमाने सर्वसामान्य प्रवाशांसाठी बंद राहणार.
2️⃣ मेट्रोसेवा बंद राहणार.
3️⃣ शाळा, कॉलेज, शिक्षण संस्था, कोचिंग क्लास बंद, ऑनलाईन शिक्षणासाठी प्रोत्साहन.
4️⃣ हॉटेल, रेस्टॉरंट आणि इतर आदरातिथ्य सेवा बंद राहणार.
5️⃣ सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांना बंदी.
6️⃣ विवाह, सोहळे, सभा-समारंभांवरील बंदी कायम.
◼ यांना मिळाली परवानगी
▪सिनेमा हॉल, शॉपिंग मॉल, जिम, स्विमिंग पूल, मनोरंजन पार्क, ऑडीटोरीअम, थेटर, बार, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि स्टेडिअम प्रेक्षकांविना उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे.
◼ कंटेन्मेंट झोन वगळता इतर भागात पुढील गोष्टींना मर्यादांसह परवानगी
▪होम डिलिव्हरी करणारी हॉटेल आणि कॅटीन सुरु राहणार.
▪पोलीस, आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी हॉटेल चालू राहणार.
▪सरकारी अधिकारी, अडकलेल्यांसाठी हॉटेल चालू राहणार.
▪आंतरराज्य प्रवासी गाड्या आणि बसने वाहतूक (दोन्ही राज्यांच्या परवानगीने).
▪राज्याने ठरवलेली जिल्हांतर्गत गाड्या आणि बसने वाहतूक.
▪रात्री 7 ते सकाळी 7 वाजेपर्यंत जीवनावश्यक सेवा वगळता सक्त संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
◼ रेड झोनमधील लोकांच्या येण्या-जाण्यावर बंदी असणार
▪65 वर्षांवरील नागरिक, इतर व्याधी जडलेल्या व्यक्ती, गर्भवती आणि 10 वर्षांखालील मुले यांनी अत्यावश्यक सेवा आणि आरोग्यविषयक कारण वगळता घराबाहेर पडू नये.
◼ एक नजर लॉकडाऊनच्या टप्प्यांवर..!
???? पहिला लॉकडाऊन – 25 मार्च ते 14 एप्रिल (21 दिवस).
???? दुसरा लॉकडाऊन – 15 एप्रिल ते 3 मे (19 दिवस).
???? तिसरा लॉकडाऊन – 4 मे ते 17 मे (14 दिवस).
???? चौथा लॉकडाऊन – 18 मे ते 31 मे (14 दिवस).
——————
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज