मंगळवेढा टाईम्स न्यूज नेटवर्क ।
बीडमधील एका कार्यक्रमात अजित पवारांनी शरद पवारांसंदर्भात केलेल्या वक्तव्याची चांगलीच चर्चा सुरुय. दरम्यान दादांच्या विधानानंतर देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांना टोला लगावलाय.
राष्ट्रवादीत बंड केल्यानंतर अजित पवारांनी अनेकवेळा शरद पवारांना लक्ष्य केलं होतं. मात्र, बीडमधील कार्यक्रमात याच अजित पवारांना शरद पवारांबाबत प्रेमाचा उमाळा आलाय. चुलत्याच्या कृपेनं आपलं बरं चाललंय असं वक्तव्य अजित पवारांनी केलं. दरम्यान त्यांच्या या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय.
अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मात्र शरद पवारांवर निशाणा साधलाय. काकांना आशीर्वादापुरतचं मर्यादित ठेवल्याचा खोचक टोला देवेंद्र फडणवीसांनी लगावलाय.
काकांना आशीर्वादासाठी मर्यादीत त्यांनी ठेवलं आहे. हे तुम्हाला कोणालाच लक्षात आलेलं नाही, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांच्या विधानावर स्पष्टीकरण दिलं.
लोकसभा, विधानसभा निवडणुकीत अजित पवारांनी शरद पवारांवर टीकास्त्र डागत अनेक आरोप केले होते. मात्र, विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवार चांगलेच मवाळ झाल्याचं पाहायला मिळाले.. तसंच अजित पवारांनी आज केलेल्या वक्तव्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? याबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरु झाल्या आहेत.
अजित पवारांच्या बीड दौऱ्यात मुंडे गैरहजर
एकीकडे धनंजय मुंडे यांनी आजारी असल्यामुळे कार्यक्रमाला उपस्थित राहता आलं नसल्याचं सांगितलं. मात्र आदल्या दिवशी धनंजय मुंडे आपल्या मुलीच्या फॅशन शोच्या कार्यक्रमात पाहायला मिळाले. याबाबत मंत्री आणि त्यांच्या बहिण पंकजा मुंडेंना विचारलं असता, काय चाललंय मला माहित नाही, पण त्यांची तब्बेत बऱ्याच दिवसांपासून बरी नाही असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं.
बीडमध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरण त्यातील वाल्मिक कराडचा सहभाग, वाल्मिक आणि धनंजय मुंडेंचे संबंध यामध्ये धनंजय मुंडे चांगलेच अडकले आहेत. या प्रकरणावरून धनंजय मुंडेंना थेट राजीनामाच द्यावा लागला.
राजीनाम्यानंतर धनंजय मुंडे सध्या राजकारणात फारसे सक्रिय दिसत नाहीत. आज पक्षप्रमुख अजित दादांच्या कार्यक्रमाला जाणंही त्यांनी टाळलं. मात्र धनंजय मुंडेंनी स्वताच जाणं टाळलं की अजितदादाच सध्या मुंडेंना थोडसं दूर ठेवतायेत, याची सध्या बीडमध्ये चर्चा रंगली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज