टीम मंगळवेढा टाईम्स ।
मराठा समाजातील तरुण-तरुणींना सरकारच्या दप्तरदिरंगाईमुळे एसईबीसीचे दाखले मिळत नव्हते. त्यातच पोलिस भरतीसाठी अर्ज भरण्याची मुदत ३१ मार्च होती. त्यामुळे दाखल्याअभावी अनेक तरुण- तरुणी या भरतीला मुकणार होते. शासनाने भरतीसाठी अर्ज करण्याची मुदत १५ एप्रिलपर्यंत वाढवली आहे.
त्याचबरोबर दाखले देण्यासाठीची कार्यवाहीही आजपासून सुरू केली आहे. त्यामुळे भरतीसाठी इच्छुक असणाऱ्यांचा जीव भांड्यात पडला आहे. मराठा समाजाची मागणी विचारात घेऊन राज्य सरकारने २० फेब्रुवारीला विशेष अधिवेशन घेतले. त्यात मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास कुटुंबांसाठी १० टक्के आरक्षण देण्यात आले.
या आरक्षणाचा लाभ शिक्षण व नोकरीत होईल, असेही जाहीर करण्यात आले. त्यानुसार सध्या सुरू असलेल्या पोलिस भरतीत एसईबीसीतील तरुणांना अर्ज करता येणार आहेत.
शासनाने आरक्षण २६ फेब्रुवारीपासून लागू करण्याचा निर्णय घेतला. मात्र, २५ मार्चपर्यंत तरी दाखले मिळालेले नव्हते. मराठा समाजातील अनेक तरुण- तरुणींनी एसईबीसी प्रमाणपत्रासाठी अर्ज केले.
मात्र, शासनाच्या जात प्रमाणपत्र वितरित होणाऱ्या संकेतस्थळावर २०१४ मधील आरक्षणाचाच संदर्भ दिसत होता. त्यामुळे प्रांताधिकारी, तहसीलदारांनी त्यासंदर्भातील मार्गदर्शन जिल्हाधिकारी यांच्याकडून मागवले आहे.
जिल्हा प्रशासनाने त्यावर शासनाकडून मार्गदर्शन मागवले होते. दरम्यान, राज्याच्या गृह विभागाने सुमारे १७ हजार पोलिसांची भरती प्रक्रिया सुरू केली होती. त्यासाठी अर्ज भरण्याची मुदत ३१ मार्च होती.
मात्र, एसईबीसी प्रवर्गातील तरुण-तरुणींसाठी या भरतीत आरक्षण देण्यात आले असूनही दाखले मिळत नसल्याने त्यांना अर्जच करता येत नव्हता. परिणामी, राज्य शासनाने ही भरतीच पुढे ढकलावी, अशी मागणी तरुणांनी केली होती.
त्याची दखल शासनाने घेऊन शासनाने आता पोलिस भरतीची मुदत १५ एप्रिलपर्यंत वाढवली आहे. त्याचबरोबर शासनाने ऑनलाइन संकेतस्थळावर एसईबीसाचा पर्याय उपलब्ध करून दिल्याने दाखले मिळण्याचाही मार्ग मोकळा झाला आहे.
कागदपत्रांची पूर्तता करून दाखले घेण्यासाठीची कार्यवाही करावी
एसईबीसीचे प्रमाणपत्र शासनाच्या ऑनलाइन संकेतस्थळावरून मिळण्यास प्रारंभ झाला आहे. त्यासाठीची आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून दाखले घेण्यासाठीची कार्यवाही करावी. दाखले लवकरात लवकर देण्यासाठीची कार्यवाही सुरू करत आहोत. -मदन जाधव, तहसीलदार, मंगळवेढा
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज