टीम मंगळवेढा टाईम्स ।
जलजीवन मिशनमधून पिण्याच्या पाण्यासाठी तालुक्यातील १७ गावांसाठी १० कोटी ६३ लाखाचा निधी मंजूर झाल्याची माहिती आ.समाधान आवताडे यांनी दिली.
लोकसंख्या स्थलांतरीत असल्याने तालुक्यात या १७ गावात पाणीटंचाई होत गावपातळीवरील लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांमधून पिण्याची सोय करावी अशी मागणी सातत्याने होत होती.
या 17 गावातील लोकसंख्या सर्वाधिक असल्याने पिण्याचा पाण्यासाठी पायपीट करावी लागत होती आ.समाधान आवताडे यांनी ग्रामस्थांच्या मागणीनुसार यात लक्ष घालून 17 गावाला निधी मिळवण्यासाठी प्रयत्न केले व या गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे.
यामध्ये ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी देखील यावर तातडीने निर्णय घेतला. त्यामुळे निधी मिळण्याचा मार्ग सुकर झाला.
यामध्ये गावे व मंजूर निधी पुढीलप्रमाणे भालेवाडी ३०.२३ लाख धर्मगाव ६१.६८ लाख डोणज ५५.३७ लाख , गोणेवाडी २१.९ ० लाख , गुंजेगाव १ कोटी ७३ लाख , हिवरगाव ६६.५४ लाख , हुन्नुर १ कोटी २४ लवंगी ५७.२० लाख , लेंडवेचिंचाळे ३०.२६,
मानेवाडी ७२.१८ लाख, निंबोणी १ कोटी ५ लाख, पाटखळ २५ लाख , रहाटेवाडी ४७.४७ , सलगर बु . १ कोटी १ ९ लाख , शिरसी २६.८५ , सोडडी ५५.४१ लाख , तामदर्डी ६३.५ लाख इतका निधी मंजूर झाला.
१७ गावातील भालेवाडी, डोणज, गोणेवाडी, हिवरगाव, पाठखळ, रहाटेवाडी , शिरसी या गावात कामास सुरुवात झाली.
कामाच्या पूतर्तेनंतर येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार असून उर्वरित गावात अद्याप कामास सुरुवात झाली नाही.
ग्रामस्थांनीही कामाच्या दर्जाबाबत पुन्हा तक्रार करण्यापेक्षा काम चांगले करुन घेण्याकडे लक्ष देण्याचे आवाहन आमदार आवताडे यांनी केले. जेणेकरुन भविष्यात पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागणार नाही.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज