मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर दीर्घकाळ रखडलेल्या महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या दृष्टीने राज्य सरकारने तयारी सुरू केली आहे. त्यासाठी राज्य शासनाने राज्यातील ‘अ, ब, क’ वर्ग महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी प्रभाग रचना तातडीने सुरू करण्याचे आदेश जारी केले.
सर्वोच्च न्यायालयाच्या ६ मे २०२५ च्या आदेशानुसार, पुढील चार महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे मुंबई पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक, पिंपरी-चिंचवड, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, वसई-विरार, छत्रपती संभाजी नगर यासह सर्व २७महानगरपालिकांसाठी प्रभाग रचना प्रक्रिया गतिमान करण्याचे आदेश राज्य सरकारने काढले.
अ वर्ग – पुणे, नागपूर, ब वर्ग ठाणे, नाशिक, पिंपरी-चिंचवड, क वर्ग – नवी मुंबई, वसई-विरार, छत्रपती संभाजीनगर, कल्याण-डोंबिवली या महानगरपालिकांतील प्रभागरचनेचे प्रारूप तयार करण्याची जबाबदारी महानगरपालिका आयुक्तांची असेल.
या महानगरपालिकांमध्ये प्रभागांची संख्या ठरवताना सर्व प्रभाग चार सदस्यांचे करायचे आहेत. सर्वच प्रभाग चार सदस्यांचे होत नसल्यास एक प्रभाग तीन अथवा पाच सदस्यांचा होईल किंवा दोन प्रभाग तीन सदस्यांचे होतील.
भौगोलिक संलग्नता लक्षात घेऊन हे प्रभाग ठरवायचे आहेत. या प्रभागरचनेवर नागरिकांकडून हरकती व सूचनाही विहित कालावधीत मागवण्याबाबत आदेशात म्हटले आहे.
ड वर्ग महानगरपालिकांच्या प्रभागरचनेचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना असतील. या महानगरपालिकांमध्ये अमरावती, अहिल्यानगर, अकोला, कोल्हापूर, सोलापूर, सांगली-मिरज-कुपवाड, मीरा-भाईंदर, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, जळगाव, नांदेड-वाघाळा, धुळे, मालेगाव, लातूर, चंद्रपूर, परभणी, पनवेल, इचलकरंजी, जालना या महानगरपालिकांचा समावेश आहे.
या महानगरपालिकांमध्ये प्रभागांची संख्या ठरवताना सर्व प्रभाग चार सदस्यांचे करायचे आहेत. सर्वच प्रभाग चार सदस्यांचे होत नसल्यास एक प्रभाग तीन अथवा पाच सदस्यांचा होईल किंवा दोन प्रभाग तीन सदस्यांचे होतील. या प्रभागरचनेवर हरकती व सूचनाही विहित कालावधीत मागवण्याबाबत आदेशात म्हटले आहे.
अधिकार कुणाला?
अ, ब आणि क वर्ग महापालिकांच्या बाबतीत प्रभाग रचनेची सदस्यसंख्या निश्चित करून प्रभाग रचनेचे प्रारूप तयार करण्याची जबाबदारी संबंधित महापालिका आयुक्तांकडे दिली आहे तर नगरपरिषद, नगरपंचायतींच्या बाबतीतील शासनाचे हे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
नगरपरिषद व नगरपंचायतींबाबत काय? नगरपरिषद व नगरपंचायतींच्या प्रभागरचनेचे अधिकार मुख्याधिकारी यांच्याकडे असतील, नगरपरिषदांच्या प्रभागांची संख्या ठरविताना सर्व प्रभाग २ सदस्यांचे करायचे आहेत.
सर्वच प्रभाग दोन सदस्यांचे होत नसल्यास एक प्रभाग तीन सदस्यांचा होईल. नगरपंचायतींची प्रभागसंख्या १७ असेल व प्रत्येक सदस्यास एक प्रभाग निश्चित करण्यात यावा, असेही आदेशात म्हटले आहे.
कोणते सूत्र वापरले जाणार?
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९ अंतर्गत मुंबई महापालिकावगळता इतर महापालिकांत प्रत्येक प्रभागातून शक्यतो चार, किमान तीन आणि कमाल पाच सदस्य निवडले जातील, अशी तरतूद २०२४ च्या अधिनियमांनुसार आहे.
प्रभाग रचना जनगणनेच्या लोकसंख्येच्या आधारे होईल. सरासरी लोकसंख्या ठरविण्यासाठी एकूण लोकसंख्या भागिले एकूण सदस्यसंख्या गुणिले प्रभागातील सदस्यसंख्या हे सूत्र वापरले जाईल.
प्रभागाची लोकसंख्या सरासरीच्या १० टक्के कमी-जास्त असू शकते; अपवादात्मक कारणांसह यापेक्षा जास्त फरक असल्यास स्पष्टीकरण आवश्यक आहे. प्रभाग रचना उत्तरेकडून सुरू होऊन दक्षिणेकडे पूर्ण होईल, भौगोलिक सलगता राखली जाईल.
रस्ते, नद्या, रेल्वे मार्ग यासारख्या नैसर्गिक सीमा 3 विचारात घेतल्या जातील. कोणत्याही इमारतीचे विभाजन दोन प्रभागांत होणार नाही तसेच महानगरपालिका आयुक्त प्रभाग रचनेचे प्रारूप राज्य निवडणूक आयोगाला सादर करतील. त्यानंतर हरकती-सूचनांवर सुनावणी होऊन अंतिम रचना जाहीर होईल, असे या आदेशात म्हटले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज