पंढरपूर | राजेंद्र फुगारे
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना चालू गाळप हंगामात उसाला प्रतिटन २ हजार ८२५ रुपये पहिली उचल देणार आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांनी कुठेही वजन करून ऊस आणावा असेही आवाहन पाटील यांनी केले आहे.
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या चालू गाळप हंगामातील एक लाख साखर पोत्यांचे पूजन शनिवारी करण्यात आले. यावेळी पाटील यांनी उसाला पहिली उचल २८२५ रुपये प्रतिटन जाहीर केली.
यापूर्वी गाळप हंगाम शुभारंभ प्रसंगी पाटील यांनी २५५० रुपये उचल जाहीर करून ऊस दराच्या शर्यतीला तोंड फोडलं होते. आ. बबनदादा शिंदे यांनी यापूर्वीच २७०० रुपये तर शुक्रवारी माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी कर्मयोगी सुधाकरपंत कारखान्याची पहिली उचल २८०० रुपये जाहीर केली होती.
या पार्श्वभूमीवर अभिजित पाटील यांनी ऊस दराच्या शर्यतीत एक पाऊल पुढे टाकले आहे. नोव्हेंबर महिन्यात गाळप होणाऱ्या उसाला २८२५ रुपये,
डिसेंबर महिन्यातील उसाला २८५० रुपये, जानेवारी महिन्यातील गाळप उसाला २९०० तर फेब्रुवारी महिन्यात २९५० रुपये, मार्च महिन्यात येणाऱ्या उसाला ३ हजार रुपये उचल देण्याची घोषणा पाटील यांनी यावेळी केली.
विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने या हंगामात जोमात गाळप सुरू केलेले आहे. गाळप सुरू झाल्यापासून १७ दिवसांत १ लाख ३८ हजार ७४० टन उसाचे गाळप केले आहे. तर एक लाख क्विंटल साखर पोती उत्पादन झाले आहे, अशी माहिती पाटील यांनी दिली.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज