टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा तालुक्यातील 27 ग्रामपंचायतीच्या उपसरपंचाच्या निवडीचा कार्यक्रम नुकताच गटविकास अधिकारी शिवाजीराव पाटील यांनी जाहीर केला असून या 27 ग्रामपंचायतीची उपसरपंच निवड 24 नोव्हेंबर रोजी एकाच दिवशी होणार आहे.
5 नोव्हेंबर मध्ये रोजी तालुक्यातील 27 ग्रामपंचायती निवडणूक प्रक्रिया पार पडली व 6 तारखेला या ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला.
या निवडणुकीत ब्रह्मपुरी व हिवरगाव येथील सरपंच बिनविरोध निवडले. तर शेलेवाडीच्या सरपंच पदाचा उमेदवार तीन मताने तर निंबोणीचे सरपंच पदाचे उमेदवार बिरूदेव घोगरे हे सर्वाधिक मतांनी विजयी झाले.
सुनीता माळी (शेलेवाडी), सुनीता पडोळकर (पडोळकरवाडी), सुनीता रेवे (रेवे), छाया मिस्कर (महमदाबाद हु.), लक्ष्मण गायकवाड (भाळवणी), सुलोचना इंगळे (अकोला), म्हांतेश बिराजदार (लोणार), भाग्यश्री कोळी (उचेठाण), लव्हाजी लेंडवे (आंधळगाव),
आमसिद्ध चौखंडे (जंगलगी), शिवाजी मेटकरी (मानेवाडी), सरस्वती थोरबोले(रड्डे), बिरूदेव घोगरे (निंबोणी), बालिका ढेकळे (देगाव), स्नेहलता पाटील (ब्रम्हपुरी बिनरोध), कमल खांडेकर (हिवरगाव, बिनरोध),
संजयसिंग रजपूत (खडकी), सरुबाई लांडगे (डिकसळ), ललिता ऐवले (चिक्कलगी), दत्तात्रय माने (जुनोनी), बाळू कांबळे, अर्चना कांबळे, यशोदा पूजा कोडगर (बठाण), अनुराधा पडवळे (खुपसंगी), कृष्णाबाई चौगुले (जालीहाळ),
अनिल पाटील (लक्ष्मी दहिवडी), अरुण जावळे(मुंढेवाडी), बाबासो कसबे (शिरसी), सुमन गोडसे (नंदूर) हे सरपंच पदी निवडले गेले आता उपसरपंच पदासाठी 24 नोव्हेंबर रोजी निवड होणार आहे.
या उपसरपंच निवडीसाठी निवडलेले अधिकारी पुढील प्रमाणे
लक्ष्मीदहिवडी (आर. बी. गोरे), खुपसंगी (एम. टी. भोसले), आंधळगांव (एन. ए. करे), नंदुर (आर. ए. म्हेत्रे), निंबोणी (एस. एन. संकपाळ), रड्डे (पी. एन. शिवशरण), ब्रम्हपुरी (एस. बी. शिंदे), मानेवाडी (एस. के. इनामदार), जुनोनी (टी. के. कांबळे), डिकसळ (आर. के. कांबळे), पडोळकरवाडी (ए. डी. चलवादी),
अकोला (डी. ए. स्वामी), शिरसी (आर. एस. जाधव), देगांव (एस. डी. लेंडवे), बठाण (पी. सी. कांबळे), शेलेवाडी (पी.बी. ढोबळे), उचेठाण (डी.व्ही. पवार), खडकी (ए.टी. कोळेकर), लोणार (आर. एस. सोनवणे), मुंढेवाडी (जे. वाय. मुलाणी), जंगलगी (आर.एस.मदभावी), भाळवणी (एस. एस. खटकाळे), रेवेवाडी ( एम. जी. पवार),
महमदाबाद (हु) (के. आर. खताळ), चिकलगी (एस.पी. कांबळे), जालीहाळ/सिध्दनकेरी (डी. डी. करे), हिवरगांव ( एम.पी. जुंदळे)
उपसरपंचाची निवड ही सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात येणार आहे यावेळेस उपसरपंच निवडला सरपंचांना मत देण्याचा अधिकार असून पहिले मत देऊन समसमान झाल्यास दुसरे निर्णायक देण्याचा अधिकार देण्यात आला. त्यामुळे काठावर विरोधक असणाऱ्या ग्रामपंचायत मध्ये सरपंच हे आपलाच उपसरपंच कसा होईल याकडे लक्ष देत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज