मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
मंगळवेढा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे शहराध्यक्ष चंद्रशेखर कोंडूभैरी यांच्या ४१ व्या वाढदिवसानिमित्त आज विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
आज मंगळवार दि.७ जानेवारी रोजी राज्यस्तरीय खेळाडूंचा सन्मान दामाजी कॉलेज येथे सकाळी ९ वाजता, किल्ला भाग येथील गुरुकूल प्राथमिक शाळा येथे सकाळी १० वाजता खाऊ वाटप, जवारहलाल शेतकी हायस्कूल येथे विद्यार्थ्यांना वह्या वाटप,
श्री संत दामाजी हायस्कूल येथे दुपारी ३ वाजता वृक्ष वाटप, या कार्यक्रमास माजी पालकमंत्री प्रा.लक्ष्मणराव ढोबळे, भैरवनाथ शुगरचे व्हा. चेअरमन अनिल सावंत, रतनचंद शहा बँकेचे राहुल शहा, उद्योजक वैभव नागणे,
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष रामेश्वर मासाळ, मंगळवेढा शेतकरी सुतगिरणीचे चेअरमन दत्तात्रय लाळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुकाध्यक्ष प्रथमेश पाटील, पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदार संघ कार्याध्यक्ष संतोष रंदवे,
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका कार्याध्यक्ष माणिक गुंगे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहराध्यक्ष जमीर इनामदार यांच्या हस्ते तर अरुण किल्लेदार, मुझफ्फर काझी, अंबादास बेंद्रे, महादेव दिवसे, नागेश राऊत, लखन दत्तू, बापूराव वस्त्रे, सदाशिव माळी, वैभव ठेंगील मायाप्पा प्रक्षाळे,
सचिन वडतिले, अय्याज शेख, सुहास मुरडे, अनवर मुल्ला, स्वप्नील फुगारे, अजय अवघडे आदी प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट मंगळवेढा शहर व तालुका यांच्यावतीने करण्यात आले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज