टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा येथील पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील संगणक, संगणक साहित्यासह व इतर एका खाजगी व्यक्तीच्या दुचाकीची अज्ञात चोरट्यांनी चोरी केली आहे.
या बाबतची पहिल्या घटनेची फिर्याद गटशिक्षणाधिकारी पोपट लवटे यांनी दिली आहे.
पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील पंचवीस हजार रुपये किमतीचा संगणक व पंधरा हजार रुपये किमतीचा जुना संगणक , दहा हजार रुपये किमतीचा शिक्षण विस्तार अधिकारी बजरंग पांढरे यांच्या निवासस्थानातील डीव्हीडी प्लेअर व पाणी फिल्टर आदी साहित्य अज्ञात चोरट्यांनी ता.४ ते ६ सकाळी नऊच्या दरम्यान चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
तर दुसऱ्या घटनेची फिर्याद प्रिया अनिल नागणे (रा.नागणे वस्ती,आंधळगाव) यांनी दिले असून त्यांची काळ्या रंगाची मोटरसायकल रविवारी रात्री दहा वाजल्यापासून ते आज सकाळी दहा वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे फिर्याद म्हटले आहे.
सिध्देवाडीत तरूणाची आत्महत्या
अज्ञात कारणावरून एका उच्चशिक्षित तरूणाने राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना सिध्देवाडी (ता . पंढरपूर) येथे सोमवारी घडली. संदीप राजाराम ननवरे ( वय २५ ) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे.
अत्यंत गरीब परिस्थितीतून आई वडिलांनी संदीपचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. सध्या तो ग्राफिक्स आणि डिझाईन क्षेत्रात काम करत होता.
आई – वडिलांना एकुलता असलेल्या संदीपने कोणत्या तरी नैराश्येतून आत्महत्या केली असावी अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे . तपास पोलिस निरीक्षक किरण अवचर हे करीत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
![ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा](https://mangalwedhatimes.in/wp-content/uploads/2021/12/WhatsApp-Add.gif)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज