मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । मंगळवेढा शहरालगत असलेल्या कुंभार तलावात एका अज्ञात तरूणाने उडी मारल्याने पाण्यात बुडून मयत झाला.दरम्यान ही घटना दि.10 च्या रात्री 7.30 वा.घडली असून या घटनेची पोलिसात नोंद झाली आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,मंगळवेढा शहरालगत बोराळे नाका परिसरात कुंभार तलाव असून या तलावात सध्या जवळपास 10 फुटापर्यंत पाणी आहे. दि.10 रोजी संध्याकाळी 7.30 वा. एका अज्ञात अंदाजे 25 ते 30 वयोगटातील इसमाने पाण्यात उडी मारल्याने तो पाण्यात पडून बूडून मयत झाला.याची खबर प्रशांत मधुकर शिवशरण याने पोलिसांत दिली आहे.
दरम्यान,रात्री उडी मारल्यानंतर काही तरूणांनी पाहिले घटनास्थळी पोलिस दाखल झाले. पोलिसांनी बॅटरीच्या उजेडावर शोधण्याचा प्रयत्न केला मात्र तो तरूण मिळून आला नाही.
पोलिस निरिक्षक जोतीराम गुंजवटे,सहाय्यक पोलिस निरिक्षक बामणे,पोलिस नाईक पाटील, घोळसगावकर,राऊत आदी पोलिस कर्मचार्यांनी दिवसभर पाण्यामध्ये शोध घेतला असता दुपारी 2.30 वा. प्रेत हाती लागले.हा इसम नेमका कुठला आहे? याने का पाण्यात उडी मारली? याचा तपास पोलिस करीत आहेत.
—-—————-
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 95 6161 7373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज