टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील लोणार येथे बेकायदेशीर सुरू असलेला कत्तलखाना बंद करावा अशी मागणी शिवसेना उबाठा गटाचे तालुकाप्रमुख प्रा. येताळा भगत यांनी केली आहे.
गेल्या दोन वर्षांपासून तालुक्यात प्रचंड स्वरूपात दुष्काळी परिस्थिती आहे. यामुळे शेतकऱ्यांकडे असणाऱ्या देशी खिलार जातीच्या गोवंशातील गाईबैलांच्या चारापाण्याचे दुर्भिक्ष असल्याने पशुपालकांना गोधन सांभाळणे मुश्कील झाले.
याचाच गैरफायदा लोणार गावातील जनावरांचा व्यापारी भासवून, नडलेल्या निसर्गामुळे हताश झालेल्या पशुपालकांनी आपल्या दारात जनावरे उपाशी ठेवण्यापेक्षा
व्यापाऱ्याला कवडीमोल किमतीने देऊन टाकली अनधिकृत कत्तलखान्याचा मालक खुलेआम कत्तलखाना राजरोसपणे चालवत दररोज जवळपास ४० ते ५० जनावरांची कत्तल करत असल्याचे येताळा भगत यांनी सांगितले.
शेतातील नांगरट अडविल्याच्या कारणावरुन एका ३२ वर्षीय युवकास बेल्टने बेदम मारहाण, दोघाविरुध्द गुन्हा दाखल
सलगर बु।। येथे शेतात ट्रॅक्टर नांगरट करीत असताना तो का अडविला ? या कारणावरुन एका ३२ वर्षीय तरुणास बेल्टने पाठीत व डोकीत मारहाण करुन तु पोलीस ठाणेस तक्रार देण्यात गेला तर तुला जीवंत सोडणार नाही अशी धमकी दिल्या प्रकरणी महिंद्रा कुंडलीक सवाईसर्जे, दशरथ कुंडलीक सवाईसर्जे या दोघा विरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील फिर्यादी सुनिल व्हनवटे हे दि.२६ रोजी दुपारी ३ वाजता दशरथ सवाईसर्जे व महिंद्रा सवाईसर्जे असे दोघे त्यांची शेतजमीन नांगरट करीत असताना
ट्रॅक्टरने सार्वजनिक रस्ता व फिर्यादीच्या जमिनीचा बांध फोडल्याने त्याचा जाब विचारल्याच्या कारणावरुन रात्री ८.४५ वाजता आरोपीने
तुझ्या वडिलांनी शेतात ट्रॅक्टर का अडविला ? असे विचारले असता मला काही माहित नाही वडिलांना विचारुन सांगतो असे म्हणून जात असताना
आरोपीने कमरेचा बेल्ट काढून फिर्यादीच्या पाठीत, डोक्यात गंभीर मारहाण केली व तु पोलीस ठाणेस तक्रार देण्यास गेला तर तुला जीवंत सोडणार नाही अशी धमकी दिल्याचे पोलीसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज