टीम मंगळवेढा टाईम्स ।
कोरोनाची लाट थोपवण्यासाठी लसीकरण वाढवावे लागेल. कोरोनाची ही लाट भयानक आहे. लसीकरणानंतरही कोरोनाची लागण होत आहे हे जगभरातील अनुभवानंतर लक्षात आले. ब्रिटनमध्ये साडेतीन महिने कडक लॉकडाऊन केले.
पहिला डोस झाल्यानंतर तेथे वैद्यकीय यंत्रणेवरील ताण कमी झाला. आपल्यालाही त्या वाटेवरून जावे लागेल, यासाठी उद्या रात्री आठ वाजल्यापासून पुढील १५ दिवस कडक संचारबंदी लागू करण्यात येईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हमध्ये सांगितले आहे. त्यामुळे लॉकडाऊन अटळ आहे.
ते म्हणाले, राज्यात ऑक्सिजन, बेड आणि रेमडेसिवीरची कमतरता आहे. वाढत्या प्रादूर्भावामुळे आरोग्य व्यवस्थेवर ताण.औषधे कमी पडणार नाही याची व्यवस्था केली आहे. राज्यात आज २५८ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून दिवसभरात ६० हजार, २१२ नवीन रुग्ण सापडले आहेत.
आपण कोणतीही गोष्ट लपवत नाही. आम्ही धाडसाने तोंड देत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती केली आहे की, केंद्र सरकारने मदत करावी.
ही मदत ऑक्सिजनरुपी मदत करावी अशी सांगितली आहे. ईशान्येकडील राज्यातून जर ऑक्सिजन आणण्यासाठी आपल्याला वेळ लागणार आहे. रस्ते वाहतुकीने ऑक्सिजन आणणे हे व्यवहारी नाही.
तो हवाई वाहतुकीने आणणे शक्य असल्यास तसे एअरफोर्सला विनंती करून तशी उपलब्धता करून द्यावी, अशी विनंती पंतप्रधानांना केली आहे.
सध्या उद्योग संकटात असल्याने जीएसटी परतावा देण्यासाठी किमान तीन महिन्यांची मुदतवाढ द्यावी.
एकदम लॉकडाऊन लावणार नाही, पण त्यासारखे काही निर्बंध लावावे लागतील. बुधवारी (14 एप्रिल) रात्री 8 वाजल्यापासून कडक निर्बंध लागू करण्यात येणार. याला केवळ पंढरपूर-मंगळवेढा काही दिवसांसाठी अपवाद असेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील इतर राज्यांमधूनही ऑक्सिजन आणण्याची परवानगी दिली. रस्त्याने ऑक्सिजन आणताना लष्कराच्या, वायू दलाच्या मदतीने हवाई मार्गाने ऑक्सिजन आणण्यासाठी परवानगी द्यावी आणि व्यवस्था करावी अशी मागणी पंतप्रधानांकडे करणार आहे.
मार्चमध्ये जीएसटीची मर्यादा असते ती आणखी 3 महिन्यांनी वाढवण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार. उद्योगधंदे राहिले पाहिजे, तरच रोजीरोटी राहिल.
या काळात रोजीरोटी गेली त्यांना व्यक्तिगत मदत करण्यासाठी पंतप्रधान मोदींकडे मागणी करणार.
रेमडेसिव्हिर इंजेक्शन कमी पडू देणार नाही.
रुग्णवाढ भयावह आहे. ऑक्सिजनचा खूप उपयोग करावा लागतोय कारण रुग्ण वाढलेत. त्यामुळे ऑक्सिजन तुटवडा होतोय.
नव्याने उत्तीर्ण होणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांना उपचाराच्या कामात सहभागी होण्याचं आवाहन. निवृत्त डॉक्टरांनीही या लढाईत सहभागी व्हावं.
14 एप्रिल सायंकाळपासून राज्यभरात ब्रेक द चेन अंतर्गत कलम 144 लागू करत संचारबंदी होणार. अनावश्यक प्रवास बंद करावा लागणार. योग्य कारणाशिवाय घराबाहेर पडता येणार नाही.
सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत अत्यावश्यक सेवा चालू असतील. लोकल आणि बससेवा बंद करणार नाही. जीवनावश्यक कर्मचाऱ्यांना प्रवासासाठी व्यवस्था ठेवणार.
उद्या रात्री आठ वाजल्यापासून कडक निर्बंध
हे राहणार बंद
राज्यात उद्यापासून १५ दिवस संचारबंदी लागू १४४ कलम लागू होणार
अत्यावश्यक सेवा सोडल्या तर सर्व आस्थापना बंद
हॉटेल, रेस्टॉरंट बंद राहणार
पुढेचा १ महिना शिवभोजन मोफत
७ कोटी लोकांना तीन किलो गहू आणि २ किलो तांदूळ मोफत
नोंदणीकृत फेरीवाल्यांना १५०० रुपये मदत
परवानाधारक रिक्षावाल्यांना १५०० रुपये आर्थिक मदत देणार
नोंदणीकृत घरगुती कारमगारांना निधी देणार
५ योजनांच्या ३५ लाख लाभार्थ्यांना अर्थिक मदत
हे राहणार सुरु
पेट्रोल पंप कार्गो सेवा सुरु
सकाळी ७ ते रात्री ८ जीवनावश्यक सेवा सुरु राहणार
पार्सल सेवा सुरु राहणार
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज