ADVERTISEMENT
mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

नागरिकांनो सावध व्हा! मी वीसवर्षे ‘राष्ट्रवादी’बरोबर होते; त्यांचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे आहेत

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
April 15, 2021
in राज्य
नागरिकांनो सावध व्हा! मी वीसवर्षे ‘राष्ट्रवादी’बरोबर होते; त्यांचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे आहेत

टीम मंगळवेढा टाईम्स ।

महाविकास आघाडी सरकारमधील तीनही पक्ष हे 60 चा आकडाही पार करू शकले नाहीत, त्यांच्या जुगाडासाठी ते एकत्र आले आहेत. मी वीस वर्षे त्यांच्याबरोबर (राष्ट्रवादी काँग्रेस) राहिले आहे.

त्यांचे खायचे दात व दाखवायचे दात वेगळे आहेत, असा आरोप भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केला.मंगळवेढा-पंढरपूर पोटनिवडणुकीतील भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत त्या बोलत होत्या.

वाघ यांनी आपल्या भाषणात महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. आपण आज विजयी उमेदवारासाठी येथे जमलो आहोत. जनतेला लुटणाऱ्या लुटारूंनाच्या विरोधात, आया बहिणींची अब्रू लुटणाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या सरकाराच्या विरुद्ध ही निवडणूक आहे.

सरकार मायबाप असल्याचे सांगितले जाते. मात्र हे कसले मायबाप सरकार, हे तर लुटारूचे सरकार आहे. या राज्य सरकारच्या काळात महिला अत्याचार वाढले. या सरकारच्या विरोधात आम्ही रस्त्यावर उतरलो. आज जनता हवालदिल आहे, त्यांना दिलासा नाही असे वाघ म्हणाल्या.

बार आणि रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर कोरोना वाढत नाही; परंतु मंदिरात गेल्यावर कोरोना वाढतो, हा जावईशोध या सरकारने लावला आहे. सत्तेची ऊब आलेले, माजखोर हे सरकार असून त्यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी पंढरपूर-मंगळवेढ्याच्या विकासासाठी समाधान आवताडे हा दमदार आवाज सभागृहात पाठवा असे आवाहन चित्रा वाघ यांनी केले.

आमदार प्रशांत परिचारक म्हणाले की, मी पंढरपुरात रोखतो, तुम्ही मंगळवेढ्यातून लीड द्या. मागील अकरा वर्षात विरोधकांनी तुम्हाला पाणी तर दिलेच नाही. फक्त सर्वे झाले, पण निधीची तरतूद केली नाही.

आमच्या उमेदवारांना निवडून द्या; अन्यथा निधी मिळणार नाही अशी थेट धमकी उपमुख्यमंत्री अजित पवार देऊन गेले. मात्र, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निधी देताना कधीही राजकारण केले नाही.

मी आणि समाधान आवताडे यांनी अनेक बेरोजगारांना रोजगार दिला, त्यांनी 11 वर्षात काय केले? ग्रामीण भागात जिथे टाकी आहे, तिथे पाईप नाहीत. जिथे पाईप आहे, तिथे टाकी नाही, अशी वाईट परिस्थिती आहे. ही निवडणूक विचाराची आहे.

भावनेची नाही. मी नाही तर माझ्या विचाराचा समाधान आवताडे आमदार झाला पाहिजे; म्हणून माझा प्रयत्न आहे. पंढरपूर मी सांभाळतो, तुम्ही मंगळवेढ्यातून मतदान द्या, समाधान आवताडे कसे आमदार होत नाहीत, हे बघूच, असा हल्ला परिचारक यांनी चढवला.

ADVERTISEMENT

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: चित्रा वाघभाजपभाजप उमेदवारराष्ट्रवादीसमाधान आवताडे
ADVERTISEMENT

संबंधित बातम्या

गालबोट! मंगळवेढ्यात वर्ग वाटपावरून शिक्षक-मुख्याध्यापकात हमरीतुमरी, ‘या’ शाळेतील प्रकार; कारवाईसाठी ‘प्रहार’ संघटना आक्रमक

आता पाचवी, आठवीची पुन्हा वार्षिक परीक्षा; विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास त्याला त्याच वर्गात बसविले जाणार

December 8, 2023
सोलापूर ब्रेकिंग! चारधाम यात्रेचे अमिष दाखवून भाविकांना लाखोंचा गंडा; चौघाविरूध्द गुन्हा दाखल

पोलिस अधीक्षक असल्याचे भासवून तरुणीशी विवाह; पती, सासू, सासऱ्यासह सात जणांवर गुन्हा

December 8, 2023
बळीराजासाठी मोठा दिलासा! आजपासून सोलापूर जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पावसाला सुरुवात; उद्यापासून पावसाचा जोर वाढणार

पावसाचा अंदाज! पुढील 48 तास ‘या’ जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी कायम राहण्याचा अंदाज

December 6, 2023
सर्वात मोठी बातमी! मराठा आंदोलक आक्रमक; उद्या मंगळवेढा बंदची हाक

महाराष्ट्राचं लक्ष! मराठा आरक्षणासाठी आजचा दिवस अत्यंत महत्वाचा; क्युरेटिव्ह पिटीशनवर आज सुनावणी

December 6, 2023
बातमी कामाची! दुसरे अपत्य मुलगी झाल्यास मिळणार ६ हजार; राज्यात पंतप्रधान मातृवंदना-२ योजना जाहीर

लाडली बहना योजना महाराष्ट्रात लागू होणार, शिंदे सरकारचा मानस; महिलांना मिळणार ‘इतके’ हजार मानधन

December 6, 2023
सोलापुरातील १४ जणांची नायब तहसीलदारपदी बढती; ११ अव्वल कारकून व तिघा मंडलाधिकाऱ्यांचा समावेश

नागरिकांनो! आज तहसीलदारांचे कामबंद आंदोलन; २८ डिसेंबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा

December 5, 2023
शेतकऱ्यांनो! पेरणी संदर्भात कृषी अधिकारी यांनी केले महत्त्वपूर्ण आवाहन; यंदाच्या खरीप हंगामात योग्य नियोजन

शेतकऱ्यांना दिलासा! फळपिकांचा विमा भरण्याची अंतिम मुदत वाढवली, योजनेत सहभागी होण्याची ‘ही’ आहे शेवटची तारीख

December 3, 2023
एक मराठा कोट मराठा! सरकारला एक तासही देणार नाही, जरांगे पुन्हा कडाडले; अकलूजमध्ये मनोज जरांगेंची विराट सभा

मोठी बातमी! दोन दिवसांत सर्व गुन्हे मागे घ्या, अन्यथा…; जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

December 2, 2023
बळीराजासाठी मोठा दिलासा! आजपासून सोलापूर जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पावसाला सुरुवात; उद्यापासून पावसाचा जोर वाढणार

शेतकऱ्यांनो! गावात पावसाचा मुक्काम कधीपर्यंत? हवाानतज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती

December 1, 2023
Next Post
शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढणार! आजपासून तापमान वाढीचे अन् वादळी पावसाचे संकेत

शेतकऱ्यांनो! महाराष्ट्रात पुढील 3 दिवसांत 'या' जिल्ह्यांत पावसाची हजेरी; अवकाळीचा धोका कायम

ताज्या बातम्या

ऊसाची पहिली उचल 2500 जाहिर करा व अंतीम बिल 3100 द्या; स्वाभिमानी शेतकरी संघटना या मागणीवर ठाम

भैरवनाथ शुगर कारखान्याने एक लाख मेट्रीक टन उसाच्या गाळपाचा टप्पा केला पूर्ण; पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यास सुरुवात

December 8, 2023
गुड न्युज! मंगळवेढा तालुक्यातील पाच हजार नागरिकांचा अन्नसुरक्षा योजनेत समावेश होणार; प्रत्येक ग्रामपंचायतीने लाभार्थ्यांची नावे तहसील कार्यालयाला कळवावीत

भरगच्च निधी! मतदारसंघातील रस्ते व पूल मजबुतीकरणासाठी ८९ कोटी रुपये निधी मंजूर, ‘हे’ रस्ते होणार गुळगुळीत; आ.आवताडेंची माहिती

December 8, 2023
सर्वात मोठी बातमी! मराठा आंदोलक आक्रमक; उद्या मंगळवेढा बंदची हाक

मोठी बातमी! मंगळवेढ्यात कुणबी प्रमाणपत्र वाटप सुरू, ‘या’ विद्यार्थिनीस मिळाले पहिले प्रमाणपत्र; तहसीलदार जाधव यांच्या प्रयत्नाला यश

December 8, 2023
गालबोट! मंगळवेढ्यात वर्ग वाटपावरून शिक्षक-मुख्याध्यापकात हमरीतुमरी, ‘या’ शाळेतील प्रकार; कारवाईसाठी ‘प्रहार’ संघटना आक्रमक

आता पाचवी, आठवीची पुन्हा वार्षिक परीक्षा; विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास त्याला त्याच वर्गात बसविले जाणार

December 8, 2023
सोलापूर ब्रेकिंग! चारधाम यात्रेचे अमिष दाखवून भाविकांना लाखोंचा गंडा; चौघाविरूध्द गुन्हा दाखल

पोलिस अधीक्षक असल्याचे भासवून तरुणीशी विवाह; पती, सासू, सासऱ्यासह सात जणांवर गुन्हा

December 8, 2023
राज्यातील 12.50 कोटी जनतेला पाच लाखांपर्यंत आरोग्य विमा कवच; ‘या’ रुग्णांचा देखील समावेश, रुग्णालयांची संख्या देखील वाढवण्यात येणार; राज्य सरकारचा निर्णय

नागरिकांनो! शिर्के मल्टीस्पेशालिटी हाॅस्पीटल येथे रविवारी मोफत मधुमेह शिबिराचे आयोजन

December 8, 2023
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा