मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
शिक्षक संघटनेतील शिक्षकाचे शालार्थ आयडीचे काम करण्यासाठी दोन लाख रुपये लाचेची मागणी करून स्वीकारण्यास संमती दिल्याप्रकरणी बार्शी तालुक्यातील आगळगाव येथील
लोकसेवा विद्यालयाचा शिक्षक सचिन प्रकाश उकिरडे (रा. आगळगाव, सध्या. दत्तनगर बार्शी) याच्यावर बार्शी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे विभागाचे विभागीय शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे यांचेशी यातील तक्रारदार यांच्या शिक्षक संघटनेशी संबंधित दोन शिक्षकांचे शालार्थ आयडीच्या अनुषंगाने बोलणे झाल्याचे शिक्षक सचिन उकिरडे याने सांगितले.
विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्यासाठी म्हणून तक्रारदाराचे शिक्षक संघटनेतील एका शिक्षकाचे शालार्थ आयडीचे केलेल्या कामाचा मोबदला व एका शिक्षकाचे
शालार्थ आयडीचे काम करण्यासाठी प्रत्येकी एक लाख रुपये असे दोन लाख रुपये लाचेची मागणी केली. लोकसेवक औदुंबर उकिरडे यांच्यावर त्यांनी पदाच्या नात्याने आवश्यक असलेले काम करण्याबद्दल प्रभाव टाकण्याकरिता
बेकायदेशीर पैसे स्वीकारण्याचा प्रयत्न केला असल्याने शिक्षक सचिन उकिरडे याच्याविरूध्द बार्शी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणेचे पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. शीतल जानवे – खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक गणेश कुंभार,
पोलिस निरीक्षक उमाकांत महाडिक, पोलिस अंमलदार सहायक पोलिस फौजदार सायबण्णा कोळी, पोलिस हवालदार शिरीषकुमार सोनवणे, पोलीस नाईक श्रीराम घुगे, रवी हाटखिळे, सन्नके, गायकवाड, शाम सुरवसे यांनी ही कारवाई केली.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज