टीम मंगळवेढा टाईम्स ।
भीषण पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर सोलापूरकरांची तहान भागवण्यासाठी उजनी धरणाच्या गाळ मोऱ्यातून शुक्रवारी दुपारी साडेचारपासून सहा हजार पाणी क्युसेक क्षमतेने भीमा नदीत सोडण्यास सुरुवात झाली आहे.
सोलापूरकरांसाठी ही आनंदाची बाब असली तरी आधीच वजा ४५ टक्के पाणी उरलेल्या उजनी धरणाचा पाणीसाठा वजा ६० टक्क्यांपर्यंत खालावला जाण्याची शक्यता आहे. पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा नगर परिषद पिण्याच्या पाणी योजना आणि भीमा नदीवरील इतर गावे व शहरे यांना पिण्याच्या पाणीपुरवठा योजनांसाठी पाणी सोडण्यात आले आहे.
सकाळी ९.३० वाजता १५०० क्युसेक विसर्गाने तर दुपारी अडीच वाजता २५०० क्युसेक विसर्गाने धरणातून नदीत पाणी सोडण्यात आले. त्यानंतर सायंकाळी सहा वाजता विसर्ग सहा हजार क्युसेकपर्यंत विसर्ग वाढविण्यात आला, असे उजनी लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे यांनी सांगितले.
यंदाच्या वर्षी उजनी धरणातील पाणीसाठ्याची स्थिती शोचनीय आहे. मागील पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्यामुळे धरणात ऑक्टोंबरपर्यंत ६०.६६ टक्क्यांपर्यत पाणीसाठा होणे शक्य झाले होते. परंतु त्यानंतर धरणातील पाणी वाटप नियोजन कोलमडल्यामुळे हिवाळ्यातच म्हणजेजानेवारी महिन्यातच धरणातील पाणीसाठी मृत साठ्यात आला होता.
धरणात ६३ टीएमसीपर्यंत पाणीसाठा आलि तर तो मृत साठा मानला जातो. या मृत साठ्यातील पाणी शेती वा उद्योगासाठी वापरता येत नाही. तर केवळ पिण्यासाठी राखीव असते.
सध्या धरणात जेमतेम वजा ४५ टक्के पाणीसाठा शिल्लक असतानाच सोलापूरसह पंढरपूर, मंगळवेढा आणि सांगोल्याची तहान भागविण्यासाठी तीव्र निकड पाहून उजनी धरणातून पाच टीएमसी पाणी सोडले जात आहे. त्यामुळे धरणात येत्या दहा दिवसांत पाणीसाठा वजा ५५ ते ६० टक्क्यांपर्यंत खालावण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
अधिकारी काय म्हणतात
सोलापूर महानगरपालिका, पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा नगर परिषद पिण्याच्या पाणी योजना आणि भीमा नदीवरील इतर गावे व शहरे यांना पिण्याच्या पाणीपुरवठा योजनांसाठी उजनी धरणाचे दरवाजे उघडून ६००० क्युसेकने पाणी सोडले आहे.
आवस्यकतेनुसार टप्प्याटप्प्याने डिस्चार्ज वाढवण्यात येणार आहे. सर्व संबंधित अधिकाऱ्यांना विनंती करण्यात येते की, कोणत्याही प्रकारची हानी टाळण्यासाठी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन उजनी धरण क्षेत अधिकाऱ्याऱ्यांनी केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज