टीम मंगळवेढा टाईम्स।
सोलापूर लोकसभा मतदारसंघात यंदा ५९.१९ टक्के मतदान झाले असून, १२ लाख १ हजार ५८६ सोलापूरकरांनी मतदानाचा हक्क बजावला. २०१९ च्या तुलनेत यंदा पाऊण टक्का मतदान वाढले झाले असून कार्यकर्ते आता अंदाज लावायला सुरू केले आहेत.
यंदा सर्वाधिक मतदान मोहोळमध्ये ६३.१५ टक्के, तर सर्वांत कमी शहर मध्य मतदारसंघात ५६.५१ टक्के झाले आहे. बुधवारी दुपारी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी मतदानाची अंतिम आकडेवारी प्रसिद्ध केली.
सोलापूर लोकसभा मतदारसंघात २०१९ साली ५८.४५ टक्के मतदान झालेले होते. यंदा ०.७४ टक्के मतदान वाढले आहे.
सोलापूर शहर मध्य मतदारसंघात २०१९ साली ५५.१० टक्के मतदान झालेले होते. यंदा या ठिकाणी १.४१ टक्के मतदान वाढले आहे.
मोहोळमध्ये यंदा ०.९३ टक्के मतदान कमी झाले आहे. दक्षिण सोलापूरमध्ये २०१९ साली ५६.४९ टक्के मतदान झाले होते. यंदा या ठिकाणी १.७९ टक्के मतदान वाढले आहे.
अक्कलकोटमध्ये २.३१ टक्के मतदान वाढले आहे. २०१९ साली या ठिकाणी ५६.८६ टक्के मतदान झाले होते.
उत्तर विधानसभा मतदारसंघात ५९.१५ टक्के मतदान झाले असून, या ठिकाणी ०.३६ टक्के मतदान वाढले. पाच वर्षांपूर्वी या ठिकाणी ५८.७९ टक्के मतदान झाले.
पंढरपूरमध्ये यंदा ५९.०४ टक्के मतदान झाले असून, या ठिकाणी ०.४ टक्के मतदान वाढले आहे. २०१९ साली या ठिकाणी ५९.४४ टक्के मतदान झालेले होते.
आठ लाख मतदारांनी फिरवली पाठ
■ सोलापूर लोकसभा मतदारसंघात एकूण २० लाख ३० हजार मतदार असून यापैकी तब्बल ८ लाख २८ हजार ५३३ सोलापूरकरांनी मतदानाकडे पाठ फिरवली.
मतदारसंघात तृतीयपंथी मतदारांची संख्या १९९ असून, यापैकी फक्त ५६ जणांनी मतदान केले. याचे प्रमाण २८ टक्के असून, १४३ जणांनी मतदानाकडे पाठ फिरवली आहे.(स्रोत:लोकमत)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज