मंगळवेढा टाईम्स न्यूज नेटवर्क ।
सोलापूर शहरातील मोदी परिसरातील बाबू जगजीवन राम वस्तीतील दोन शाळकरी मुलींचा शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. नातेवाइकांनी दूषित पाण्यामुळे झाल्याचा आरोप केला.
मात्र, वैद्यकीय अहवालानुसार डेंग्यूसदृश आजाराने मृत्यू झाल्याचे सांगत महापालिका आयुक्त डॉ.सचिन ओम्बासे यांनी कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन केले.
जिया महादेव म्हेत्रे (वय १५, रा. मोदीखाना), ममता अशोक म्हेत्रे (वय १३, रा. मोदीखाना) अशी मृत मुलींची नावे आहेत. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात या मुलींना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. यातील जिया म्हेत्रे हिला शुक्रवारी सायंकाळी सोलापूर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, काल शनिवारी सकाळी ९:४५ वाजता तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर ममता म्हेत्रे हिचा शुक्रवारी रात्री मृत्यू झाला.
शवविच्छेदनानंतर वैद्यकीय अहवालानुसार डेंग्यूसदृश आजाराने मृत्यू झाल्याचे महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी जाहीर केले. जयश्री महादेव म्हेत्रे हिच्यावर उपचार सुरू असून ती बेशुद्ध आवस्थेत असून, तिची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेमुळे जगजीवन राम वस्तीवर शोककळा पसरली आहे.
या घटनेची माहिती मिळताच खासदार प्रणिती शिंदे, आमदार देवेंद्र कोठे, माजी नगरसेवक किसन जाधव यांनी बाबू जगजीवन राम वस्तीला भेट दिली.
संबंधित कुटुंब यांची विचारपूस केली. त्याचबरोबर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनीही अधिकाऱ्यांसमवेत या ठिकाणी भेट देऊन परिसराची पाहणी केली.
पाण्याची तपासणी करण्यात आली. ड्रेनेजलाइन, चेंबर इतर बाबींसंदर्भात कार्यवाही करण्याचे आदेश दिले. यावेळी परिसरातील नागरिकांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या.
ड्रेनेजलाइन चेंबरमधून पाण्याची पाइपलाइन गेली असल्याने पाणीपुरवठा दूषित होतो. यासंदर्भात कार्यवाही केली जात नाही. तक्रार करूनही महापालिका अधिकारी दखल घेत नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज