टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा सबझेलमधून खूनासारख्या गंभीर गुन्हयातील तीन आरोपी पळून गेल्याप्रकरणात गार्डवर असलेल्या पोलिस हवालदार नामदेव कोळी,पोलिस कॉन्स्टेबल नागनाथ डबरे यांनी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी या दोघांना पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांनी निलंबीत केले आहे तर पोलिस कॉन्स्टेबल अनिल दाते,पोलिस कॉन्स्टेबल अजित सुरवसे,अजित मिसाळ यांना सोलापूर येथील पोलिस मुख्यालयात अॅटॅच करण्यात आले असल्याची माहिती पोलिस निरिक्षक जोतीराम गुंजवटे यांनी दिली.
मंगळवेढा जबजेलमध्ये 28 कैदी हे पॉझिटिव्ह आल्याने त्यांना प्रत्यक्ष गजाआड न ठेवता बाहेरच्या व्हरांडयात ठेवण्यात आले होते. दि. 20 जुलै रोजी पहाटे 3.15 च्या दरम्यान खून प्रकरणातील आरोपी संजय बाळकृष्ण शिरगावे(वय 40,कोल्हापूर)तसेच आरोपी कृष्णा गोटीराम काळे (रा.कोपर्डी,ता.बार्शी) व राजा मधुकर पवार (रा.पेनूर) या तीघांनी गार्डवर असलेल्या पोलिस कर्मचार्यांना डुलका लागल्याचा फायदा घेत तीन आरोपीनी पलायन केले होते.
उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रय पाटील व पोलिस निरिक्षक जोतीराम गुंजवटे यांनी जीवाचे रान करून मोबाईल लोकेशनवरून पळालेल्या आरोपीना पकडण्यात यश मिळविले.गार्डवर असलेले पोलिस हवालदार नामदेव कोळी हे गार्डवर होते तर पोलिस नाईक बजरंग माने,पोलिस कॉस्टेबल नागनाथ डबरे हे पहारेकरी होते.
तर पोलिस कॉन्स्टेबल अनिल दाते,पोलिस कॉन्स्टेबल अजित सुरवसे,अजित मिसाळ हे झेलच्या साईडच्या बाजूने डयुटीवर होते. यातील तीघांना पोलिस मुख्यालयात अटॅच करण्यात आले आहे तर पोलिस नाईक बजरंग माने हा बोकड मटण पार्टी प्रकरणात निलंबीत झाला आहे.
गेल्या वर्षभरात तीन वेळा आरोपी पळून जाण्याची घटना घडली होती. पोलिस अधिक्षकांच्या या कारवाईमुळे कर्तव्यात कुचराई करणार्या पोलिस कर्मचार्यांचे धाबे दणाणले आहे.
Two accused in escape case, two suspended while three others attached to headquarters Types in solapur mangalwedha subzel
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज