टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा शहरातील साठे नगर येथील स्वप्नील सर्जेराव मोहिते (वय.२०) हा युवक अचानक बेपत्ता झाल्याची तक्रार त्याचे वडील सर्जेराव बबन मोहिते यांनी मंगळवेढा पोलिसांत नोंदविली आहे.
दि.१३ फेब्रुवारी रोजी पहाटे ४.०० च्या सुमारास स्वप्नील मोहिते हा राहते घरातून कोणास काही एक न सांगता निघून गेला असे तक्रारीत नमूद आहे.
सदर युवक अंगाने सडपातळ असून रंग सावळा, नाक चपटे, चेहरा उभट,उंची ५.५ इंच, अंगात निळ्या रंगाचा टी शर्ट व काळया रंगाची पँट असून त्याचे शिक्षण बारावी झाले असून त्याला मराठी बोलता येते.
तरी सदर वर्णनाचा युवक कोणास आढळून आल्यास त्यांनी मंगळवेढा पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
रवी मोरे यांना युवा शिवसन्मान गौरव पुरस्कार जाहिर
मंगळवेढयाचे शिवप्रेमी कार्यकर्ते रवी शिवाजी मोरे यांना अखिल भारतीय शिवजयंती महोत्सव पुणेचा युवा शिवसन्मान गौरव जाहिर करण्यात आला आहे.
न्यायालयीन कर्मचारी असलेले रवी मोरे यांना इतिहासाची मोठी आवड असून गडकोट मोहिम , ऐतिहासिक वास्तूचे संशोधन व लेखन आदींमध्ये त्यांना एक प्रकारची गोडी निर्माण झाली असून त्यांच्या कामाची दखल घेत त्यांना सदरचा पुरस्कार जाहिर करण्यात आला आहे.
या पुरस्काराचे वितरण मंगळवार दि.१६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.०० वा आ. रोहित पवार यांच्या हस्ते व मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास दिवसे , पुणे मनपाचे मुख्य अभियंता प्रशांत वाघमारे , अतिरिक्त आयुक्त सुरेश जगताप आदींच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे.



बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज














