टीम मंगळवेढा टाईम्स ।
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात जोरदार राडा पाहायला मिळाला. तालिका अध्यक्षांना धक्काबुक्की प्रकरणी भाजपच्या 12 आमदारांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे. निलंबनाचा प्रस्ताव सादर केल्यानंतर भाजपने कामकाजावर बहिष्कार करून वॉक आऊट केलं.
तालिका अध्यक्षांसोबत गैरवर्तन केलेल्या आमदारांच्या निलंबनाचा ठराव अनिल परब यांनी मांडला आणि तो मंजूर करण्यात आला. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्षेप घेतला.
सभागृहात हा ठराव एकतर्फी मांडण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच विरोधी पक्षाचा सभागृहातील संख्या कमी करण्याचा प्रयत्न आहे, अशी घणाघाती टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.
हे आहेत बारा आमदार –
डॉ. संजय कुटे (जामोद, जळगाव), आशिष शेलार (वांद्रे पश्चिम), अभिमन्यू पवार (औसा, लातूर), गिरीश महाजन (जामनेर, जळगाव),
अतुल भातखळकर (कांदिवली पूर्व, मुंबई), पराग अळवणी (विलेपार्ले, मुंबई), हरिश पिंपळे (मूर्तिजापूर, अकोला), राम सातपुते (माळशिरस, सोलापूर),
जयकुमार रावल (सिंदखेडा, धुळे), योगेश सागर (चारकोप, मुंबई), नारायण कुचे (बदनापूर, जालना), कीर्तिकुमार भांगडिया (चिमूर, चंद्रपूर)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज