टीम मंगळवेढा टाईम्स । विश्वनाथ उर्फ बाबू गवळी (वय २७ रा. संत रोहिदास नगर) मंगळवेढा यांचे आज पहाटे २ वा. अश्विनी रुग्णालय सोलापुर येथे निमोनिया या अजारावर उपचार सुरू असताना निधन झाले.
विश्वनाथ गवळी हे अत्यंत मनमिळावू मितभाषी चर्मकार समाजातील युवा सामाजिक कार्यकर्ते होते इंग्लिश स्कूल मंगळवेढा येथे शिक्षक पदावर कार्यरत होते, व इंण्डेन गॅस येथे अर्धवेळ कामावर होते.त्यांना श्र्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने कॉटेज रुग्णालय पंढरपूर येथे दाखल करण्यात आले.
विश्वनाथ उर्फ बाबू गवळी यांचे दुःखद निधन pic.twitter.com/tYA5SzdfQA
— Mangalwedha Times (@SamadhanFugare) August 23, 2020
परंतु त्रास वाढत गेल्याचे निदर्शनास आल्यानंतर सोलापूर येथील सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले तेथे व्हेंटिलेटर वर ठेवण्यात आले काल दिनांक २२/०८/२०२० रोजी तब्येत जास्तच खलवात चालल्याने अश्विनी रुग्णालयात दाखल केले परंतु फुफुस व ह्र्दय नीट काम करत नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले.व काही अवधी मध्येच निधन झाले.
उपचारासाठी अॅड.दत्तात्रय खडतरे, उपविभागीय कृषी अधिकारी रवींद्र कांबळे, उद्योजक अविनाश शिंदे,चर्मकार समाजाचे नेते अशोक लोकतुरे , दामाजी माळी,अमोल सौदागर यांच्या सह आणेकानी प्रयत्न केले. परंतु दुर्दैवाने यश आले नाही त्यांचे पश्चात आई वडील २ विवाहीत बहिणी असा परिवार आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज