टीम मंगळवेढा टाइम्स ।
कर्जापोटी बँकेच्या हप्त्याचा तगादा तसेच एका साखर कारखान्याने सहा महिने झाले तरी ऊस बिल देत नसल्याने वैतागलेल्या शेतकऱ्याने स्वतःचा ट्रॅक्टर विहिरीत सोडून दिल्याचा प्रकार माढा तालुक्यातील तांबोळे येथे घडला.
दिगंबर मच्छिंद्र पवार असे शेतकऱ्यांचे नाव आहे. मच्छिंद्र पवार यांची गावात अडीच एकर शेती आहे. भीमा कारखान्याचे ते सभासद आहेत.
जानेवारी महिन्यात साधारण ६७ टन ऊस त्यांनी भीमा कारखान्याला घातला होता. कारखान्याकडून साधरण २७०० रुपये दर प्रमाणे पावणे दोन लाख रुपये ऊसबील येणे बाकी होते.
पैकी बाराशे रुपये दर प्रमाणे अॅडव्हान्स सत्तर हजार रुपये आजारी अज्जीला दवाखाना खर्चासाठी मंजूर करून दिले. बाकी सहा महिने झाले तरी ऊस बिल मिळत नव्हते.
तर दुसरीकडे शेतीसाठी दोन लाख ७५ हजाराचे कर्ज घेऊन पवार यांनी ट्रॅक्टर घेतला होता. त्यामुळे बँकेने वसुलीसाठी तगादा लावला होता. ऊसबील मिळेना आणि बँकेच्या कर्जाच्या हफ्त्यासाठी लावलेल्या त्रासाला कंटाळून शेवटी ट्रॅक्टरच विहिरीत टाकण्याचा निर्णय दिगंबर पवार यांनी घेतला.
दोन हफ्ते थकल्याचे महिंद्रा कोटक बँकचे अधिकारी किरण कराळे यांनी सांगितले. याबाबत कारखान्याचे एमडी सुर्यकांत शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.(स्रोत:दिव्य मराठी)
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज