टीम मंगळवेढा टाईम्स ।
भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रॅक्टरने एका वृध्दाला जोराची धडक दिल्याने वृद्धाचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना आज दुपारी मरवडे रोडवरील महिला हॉस्पिटल समोर घडली आहे.
विठोबा नागु हिवरे (वय.77 रा.आंधळगाव ता.मंगळवेढा) असे मयत झालेल्या वृद्धाचे नाव आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मयत विठोबा हिवरे हे अशक्तपणा वाटू लागल्यामुळे महिला हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी आले होते.
रोड ओलांडत असताना मरवडे कडून मंगळवेढा कडे येणाऱ्या ट्रॅक्टर पाठीमागे दोन ट्रॉली जोडून भरधाव वेगाने येऊन धडक दिल्याने वृद्ध ठार झाला आहे.
घटनास्थळी पोलीस हवालदार तुकाराम कोळी व कैलास खटकले यांनी भेट देऊन पंचनामा केला आहे.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज