टीम मंगळवेढा टाईम्स ।
शाहू शिक्षण संस्था व सावली फाऊंडेशन आयोजित स्व.सौ.अनुराधा लक्ष्मण ढोबळे यांच्या जयंती निमित्त महा आरोग्य शिबीराचे आयोजन केले आहे.
यावेळी बालरोग तज्ञ डॉ.शितल शहा, मेंदू व मणका तज्ञ, गोल्डमेडलीस्ट डॉ.शुभदा खंदारे, अस्थिरोग तज्ञ डॉ.प्रशांत निकम, स्त्री रोग तज्ञ डॉ.बकुळ जाहगीरदार, नेत्र तज्ञ डॉ.हरणमारे अशा तज्ञ अनुभवी व नामवंत डॉक्टरांच्या उपस्थितीत महा आरोग्य शिबीर होत आहे.
यावेळी इंडियन आयडॉल फेम, सुप्रसिद्ध गायिका कार्तीकी गायकवाड व अभिनेत्री व गायिका आर्या आंबेकर यांच्या सुरेल आवाजात अनुसंध्या सुर अभंगाचे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचा प्रसिध्दी पत्रक प्रकाशन रविवार दिनांक १४ नोव्हेंबर सकाळी ११ वाजता माध्यमिक, प्राथमिक आश्रमशाळा, येड्राव (खवे) मंगळवेढा.ता . मंगळवेढा जि. सोलापूर येथे
शाहु शिक्षण संस्थेच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितित शाहू शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा . लक्ष्मणराव ढोबळे , संस्थेचे अध्यक्ष अब्राहम आवळे , महात्मा फुले सुतगीरणी चे चेअरमन अभिजीत ढोबळे यांच्या हस्ते केले जाणार आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज